Cannes 2019 : बॉलिवूडची 'क्वीन' चक्क कांजिवरम नेसून अवतरली कानच्या रेड कार्पेटवर

Cannes 2019 : बॉलिवूडची 'क्वीन' चक्क कांजिवरम नेसून अवतरली कानच्या रेड कार्पेटवर

बॉलिवूडची 'क्वीन'कंगना रनौटने कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर केलेली एंट्री सगळ्यांच्या भुवया उंचावणारी ठरली. ती चक्क पारंपरिक भारतीय साडीत दिसली.

  • Share this:

मुंबई, 16 मे : दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, हिना खान अशा अभिनेत्री कानच्या रेड कार्पेटवर झळकत आहेत. बॉलिवूडची 'क्वीन'कंगना रनौटने कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर केलेली एंट्री मात्र सगळ्यांच्या भुवया उंचावणारी ठरली. कान्समध्ये नेहमी वेस्टर्न आउटफिट्स, इव्हनिंग गाउन्स अशा डिझायनर वेअरची चलती असते. कंगनाने मात्र या वेळी धक्का देत चक्क कांजिवरम साडी नेसली.

मोतिया रंगाच्या साडीमध्ये महाराणीच्या आवेशात कंगनाने दिलेली पोझ सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. तिच्या या अस्सल देसी लुकबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
 

View this post on Instagram
 

THE QUEEN HAS ARRIVED!! #Kangana arrives at #Cannes2019 in a custom @falgunishanepeacockindia sari 👄👄👄 . . Hair: @alipirzadeh Makeup: @anilc68 styling: @stylebyami @shnoy09 Photo: @frozenpixelstudios Project: @pankhurifetch . . #KanganaAtCannes #LiveVictoriously #Greygooselife #Queenatcannes


A post shared by Kangana Ranaut (@team_kangana_ranaut) on


बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या आपल्या आगामी पंगा आणि कान फिल्म फेस्टिव्हलमुळे चर्चेत आहे. 'पंगा' सिनेमात ती कबड्डीपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी तिने आपलं वजनही वाढवलं होतं. पण आता कानमधील रेड कार्पेट लुकसाठी तिनं मेहनत घेऊन  वजन कमी केलं.


10 दिवसात 5 किलो वजन केलं कमी

कानच्या रेड कार्पेट लुकसाठी तिने फक्त १० दिवसांमध्ये तब्बल ५ किलो वजन कमी केलं आहे. ही सगळी उठाठेव फक्त रेड कार्पेटसाठी केली जात आहे. कंगनाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर कंगनाची मेहनत चांगलीच दिसत आहे. कंगनाच्या टीमने तिचे पहिले आणि आताचे असे अनेक फोटो शेअर केले आहेत.

कंगनाच्या वेट लॉसमध्ये योगेश भटेजा तिची मदत करत आहे. सध्या बॉलिवूडच्या या क्वीनचा तो फिटनेस ट्रेनर झाला आहे. याबद्दल बोलताना योगेश म्हणाला की, ‘कंगनाला ‘पंगा’ सिनेमासाठी वजन वाढवायचं होतं. यासाठी तिला जास्त कॅलरी असलेलं डाएट फॉलो करावं लागत होतं.


शुटिंगवेळी या 5 अभिनेत्यांचा झालेला अपघात, विकीला तर पडले 13 टाके

‘लस्ट स्टोरीज’मधील तो सीन पाहून किआरा आडवाणीच्या आजीने दिली होती ही प्रतिक्रिया


'पंगा'चं चित्रीकरण संपवल्यानंतर तिला लगेच वजन कमीही करयाचं होतं. तिच्यासाठी हे सोपं नव्हतं. कारण वजन कमी करण्यासाठी तिला सरळ कॅलरी कमी करणं आवश्यक होतं. यामुळे ती दिवसाला दोनदा वर्कआउट करायला लागली, तेव्हा जाऊन तिने १० दिवसांमध्ये ५ किलो वजन कमी केलं.’ पण तिच्या फोटोंवर १० दिवसांमध्ये ५ किलो वजन कमी करणं निव्वळ अशक्य असल्याच्या कमेंट करत आहेत.


कान फिल्म फेस्टिव्हलसाठी कंगनाने खास प्लॅनिंग केलं आहे. ती रेड कार्पेटवर जड गाउनमध्ये दिसणार नसून फार पारंपारिक भारतीय पेहरावात दिसणार आहे. आपल्या या लुकबद्दल मिड-डेशी बोलताना कंगना म्हणाली की, मी जे कपडे घालेन त्यात ड्रामा असेल. एक भारतीय अभिनेत्री म्हणून माझं कर्तव्य आहे की मी आपली संस्कृती तिथे दाखवावी आणि त्याला प्रोत्साहन द्यावं. मी आणि माझी स्टायलिस्ट एमी पटेल यावर अनेक आठवड्यांपासून काम करत आहोत. फाल्गुनी आणि शेन पीकॉक यांच्या मदतीने आम्ही एक साडी डिझाइन केली आहे. या साडीच्या मार्फत आम्ही विस्मृतीत गेलेल्या नक्षीकामाला जगासमोर आणणं आहे. यामुळे जगाला आपली संस्कृती आणि आपली कला दिसेल.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2019 09:15 PM IST

ताज्या बातम्या