राजकारणात प्रवेश करण्याबाबत अखेर कंगणाने मौन सोडलं...मोदींबाबत केलं वक्तव्य

राजकारणात प्रवेश करण्याबाबत अखेर कंगणाने मौन सोडलं...मोदींबाबत केलं वक्तव्य

नरेंद्र मोदींच्या समर्थनाबाबत वारंवार कंगना रणौत हिला प्रश्न उपस्थित केले जात होते, त्यातचं आता कंगना यावर व्यक्त झाली आहे

  • Share this:

मुंबई, 15 ऑगस्ट : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्याबाबत गेल्या खूप काळापासून अनेक बातम्या समोर येत आहेत. कंगना राजकारणात जाऊ इच्छित असल्याची चर्चा सुरू होती. यावर अखेर कंगना रणौत हिच्या वक्तव्यामुळे पूर्णविराम लागला आहे. कंगना रनौत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं समर्थन सुरुवातीपासून करीत आहे. याच कारणामुळे ती राजकारणात येणार असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. आता कंगनाने याप्रकरणात आपलं मौन सोडलं आहे. तिने स्पष्ट केलं आहे की, 'अभिनय माझं पहिलं प्रेम आहे'.

कंगनाने याबाबत दोन ट्विट केले आहेत. यात तिने लिहिलं आहे - ज्यांना वाटतं की मी मोदीजींचं यासाठी समर्थन करते कारण मला राजकारणात जाण्याची इच्छा आहे, त्यांना मला स्पष्ट सांगायचे आहे की माझे आजोबा 15 वर्षांपर्यंत काँग्रेसमध्ये MLA होते. माझे कुटुंब राजकारणाशी जोडलेलं आहे आणि मला माझा गँगस्टर चित्रपटानंतर दरवर्षी काँग्रेसकडून ऑफर दिली जात आहे.

तिने आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे की मणिकर्णिका चित्रपटानंतर भाजपनेही मला एका तिकिटाची ऑफर दिली होती. मी माझ्या कामावर प्रेम करते आणि कधीच मी राजकारणात जाण्याबाबत विचार केला नाही. त्यामुळे जे लोक माझ्या आवडीच्या व्यक्तीला समर्थन करण्यासाठी मला ट्रोल करीत आहे, त्यांना आता थांबायला हवं.

Published by: Meenal Gangurde
First published: August 15, 2020, 5:50 PM IST

ताज्या बातम्या