बाॅलिवूडची क्वीन साकारणार झाशीची राणी

बाॅलिवूडची क्वीन साकारणार झाशीची राणी

'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमात कंगना राणावत राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत आहे.

  • Share this:

14 एप्रिल : बॉलिवूड क्वीन कंगना रणावत आता झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' असं या सिनेमाचं नाव आहे. सिनेमाचा फर्स्ट लूक बाॅलिवूड विकीपिडियानं शेअर केलाय.

एका फॅशन ब्रॅण्डच्या प्रमोशनदरम्यान कंगनाने तिच्या या सिनेमाबद्दल माहिती दिली. 'रंगून' सिनेमाला योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यामुळे कंगना फार अस्वस्थ होती. अपेक्षेप्रमाणे सिनेमाला प्रतिसाद मिळाला नाही असंही कंगनाने म्हटलं होतं.

कंगना सध्या हंसल मेहताच्या 'सिमरन' सिनेमाच्या पोस्ट प्राॅडक्शनमध्ये बिझी असून त्यानंतरच 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' च्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

सिनेमाची कथा 'बाहुबली' सिनेमाचे लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची आहे तर दिग्दर्शन 'गब्बर इज बॅक'चे दिग्दर्शक कृष करतील.

कंगना तिच्या आगामी सिनेमाच्या जोरदार तयारीला लागली आहे. बऱ्याच दिवसांपासून ती घोडेस्वारी आणि स्टंटसुद्धा शिकतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2017 03:40 PM IST

ताज्या बातम्या