Elec-widget

कंगना घेणार पुन्हा एकदा पंगा, कलाकारांमध्ये सुरू होतेय युद्ध

कंगना घेणार पुन्हा एकदा पंगा, कलाकारांमध्ये सुरू होतेय युद्ध

कंगनाची मनकर्णिका आता रिलीजसाठी सज्ज आहे. या सिनेमाचं प्रमोशन थोड्या दिवसांनी सुरू होईल. पण कंगना आता नव्या सिनेमाकडे वळलीय

  • Share this:

मुंबई, 12 नोव्हेंबर : कंगनाची मनकर्णिका आता रिलीजसाठी सज्ज आहे. या सिनेमाचं प्रमोशन थोड्या दिवसांनी सुरू होईल. पण कंगना आता नव्या सिनेमाकडे वळलीय. थोडक्यात सांगायचं तर कंगना पंगा घेणार आहे.


सिनेमाची दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारीनच याची माहिती दिलीय. सिनेमाचं नाव आहे पंगा. दिग्दर्शिकेनं सोशल मीडियावर या सिनेमाची माहिती दिलीय. सरळ रस्त्यावर स्वप्नांशी पंगा अशी सिनेमाची कॅचलाईन आहे. सिनेमाच्या पहिल्या श्येड्युलचं शूटिंग भोपाळमध्ये होणार आहे.Loading...


हा सिनेमा आहे कबड्डी खेळाडूंवर. कंगनाशिवाय या सिनेमात ऋचा चड्ढा, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी आणि जस्सी गिल यांच्याही भूमिका आहेत.


गांधी जयंतीचं औचित्य साधून २ ऑक्टोबरला सिनेमाचा अधिकृत टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. हा टीझर पाहून सिनेमाबद्दलची आतापर्यंत असलेली उत्सुकता आणखीन शिगेला पोहोचते. सिनेमात राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यगाथा सांगण्यात आली आहे. सिनेमात दाखवण्यात आलेली भव्यता, लक्ष्मीबाईचे शौर्य, यांवरून नजर हटत नाही.


राणी लक्ष्मीबाई ही व्यक्तिरेखा कंगना अक्षरशः जगली असेल यात काही शंका नाही. तिला बॉलिवूडची क्वीन का म्हणतात हे पुन्हा एकदा तिने या टीझरवरून स्पष्ट केलं आहे. टीझरमध्ये तिच्या तोंडी एकही संवाद नाही. टीझरच्या शेवटी फक्त तिच्या तोंडून ‘हर हर महादेव’ असा जयघोष ऐकू येतो. या सिनेमात कंगना रणावत, शंकर, एहसान, लॉय आणि प्रसुन जोशी अशा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची मांदियाळी आहे. हॉलिवूडचे प्रसिद्ध अक्शन कोरिओग्राफर निक पॉवेल यांनी या सिनेमाचे अॅक्शन सीन कोरिओग्राफ केले आहेत.


प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कसे कमवणार कोटी रुपये?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2018 12:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...