...हरामखोर कुणाला म्हणालात? राऊतांना द्यावं लागणार कोर्टात उत्तर

दरम्यान, कंगना आणि शिवसेनेतील संघर्ष अजूनही थांबला नसून दोन्ही बाजूने अद्यापही आक्रमक प्रतिक्रिया देण्यात येत आहे.

कंगना-बीएमसी वाद आता चिघळला आहे

  • Share this:
    मुंबई, 28 सप्टेंबर : चित्रपट अभिनेत्री कंगना रनौतचे कार्यालय तोडण्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात मोठी चर्चा सुरू आहे. कोर्टाच्या सुनावणीदरम्यान वादग्रस्त शब्द 'हरामखोर'चा उल्लेख करण्यात आला. यावर कोर्टाने सांगितलं की, शिवसेना नेता संजय राऊन यांनी हा शब्द का वापरला याचं उत्तर द्यावं लागेल. कोर्टाची सुनावणी आज दुपारी पुन्हा सुरू झाली आहे. BMC ने सांगितले हे अवैध्य बांधकाम कोर्टात पालिकेच्या वकिलांनी सांगितले की, ही याचिका वेगळ्या प्रकारे दाखविण्यात आली आहे. मात्र सत्य परिस्थिती थोडी वेगळी आहे. हे एक असं प्रकरण आहे की जेथे याचिकाकर्त्याने बेकायदेशीर रुपात अवैध्य बांधकाम करण्यात आलं आहे. कंगनाच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की, त्यांनी कंगनाचे 30 ऑगस्टपासून ते आतापर्यंतचे सर्व ट्विट सादर केले आहेत. त्यांनी असंही सांगितलं की ते संजय राऊत यांची संपूर्ण मुलाखत शोधू शकले नाहीत. केवळ एक क्लिप आहे जी पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. संपूर्ण व्हिडीओ शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी कोर्टाने कंगना रणौतच्या वकिलाला बीएमसीच्या कारवाईसंबंधित फाइल आणि संजय राऊत यांच्या दोन्ही मुलाखतीचे क्लिप आणण्यास सांगितले होते. यापूर्वी कंगनाच्या कार्यालयात कारवाईबाबत पालिकेच्या वकिलांनी सांगितलं की, कंगना म्हणते की हे सर्व त्यांच्या 5 सप्टेंबर रोजी केलेल्या ट्विटमुळे झालं आहे , तर ते ट्विट काय होतं, कोर्टाच्या समोर ते सादर केलं जावं ज्यामुळे वेळ लक्षात येईल. हे ही वाचा-'फार्म हाऊसवर ड्रग्ज आणि दारुची पार्टी झाली...', श्रद्धा कपूरचा मोठा खुलासा कोर्टात राऊतांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप ऐकवली कंगनाच्या वकिलांनी यावर म्हटलं की, कंगनाने सरकारच्या विरोधात काही वक्तव्य केलं होते आणि त्यांच्या एका ट्विटवर संजय राऊत यांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली होती. राऊत म्हणाले होते की, कंगनाला धडा शिकवावा लागेल. सोबतच कोर्टात कंगनाचे वकिल बिरेंद्र सराफ म्हणाले की, संजय राऊत यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडीओ क्लिप ऐकवला, ज्यात त्यांनी हरामखोर शब्दाचा उल्लेख केला होता. कोर्टाने विचारलं की, राऊत यांचं वक्तव्य रेकॉर्ड करू शकता? यावर संजय राऊत यांच्या वकिलांनी सांगितलं की, माझे अशीलांनी कोणाचं नाव घेतलं नाही. कोर्टाने राऊत यांचे वकील प्रदीप थोराट यांना विचारलं की, जर संजय राऊत म्हणतात की त्यांनी कंगनासाठी या शब्दाचा वापर केला नाही, तर आपण हा जबाब रेकॉर्ड करू शकतो? यावर उद्या एफिडेव्हिट फाइल करणार असल्याचं राऊत यांच्या वकिलाने सांगितलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published: