Home /News /entertainment /

कंगनासाठी हरामखोर शब्द का वापरला? संजय राऊतांनी दिलं स्पष्टीकरण

कंगनासाठी हरामखोर शब्द का वापरला? संजय राऊतांनी दिलं स्पष्टीकरण

दरम्यान, कंगना आणि शिवसेनेतील संघर्ष अजूनही थांबला नसून दोन्ही बाजूने अद्यापही आक्रमक प्रतिक्रिया देण्यात येत आहे.

दरम्यान, कंगना आणि शिवसेनेतील संघर्ष अजूनही थांबला नसून दोन्ही बाजूने अद्यापही आक्रमक प्रतिक्रिया देण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि कंगना रणौत यांच्यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत

    मुंबई, 7 सप्टेंबर : मुंबई पोलिसांवर अभिनेत्री कंगना रणौत हिच्या वक्तव्यानंतर चिडलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता नवीन वक्तव्य केलं आहे. या प्रकरणात त्यांनी हरामखोर या शब्दाचा अर्थही उलगडून सांगितला आहे. आतापर्यंत कंगनावर सडेतोड टीका करणारे संजय राऊत म्हणाले, अभिनेत्री कंगना रणौत म्हणजे नॉटी गर्ल आहे. हरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे आणि बेईमान आहे. असं मला वाटतं.. असं आता संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वीच कंगनाने मुंबई ही पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते असं ट्विट केलं होतं. त्यानंतर कंगना आणि संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्यात संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईला येऊ नको, असा सल्ला दिला होता. यावर कंगनाने मुंबई कोणाच्या बापाची नसल्याचे सांगत 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं होतं. यानंतर कंगनाला सुरक्षा देण्याचं आवाहन विविध नेत्यांकडून केलं जात होतं. त्यातच गृहमंंत्रालयाने कंगनाला Y दर्जाची सुरक्षा देणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana ranaut) शिवसेनेशी पंगा घेणं चांगलंच महागात पडत आहे. कंगनाच्या मुंबईतील ऑफिसमध्ये (Kangana ranaut office) मुंबई महापालिकेचे अधिकारी आले आहेत. कोणतीही नोटीस न  देता बीएमसी अधिकारी आपल्या ऑफिसमध्ये जबरदस्ती घुसल्याचा आरोप कंगनाने केला आहे. कंगनाने याचा व्हिडीओही आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हे ही वाचा-सुशांतच्या दिलं होतं विष? गळ्यावरील खुणेमुळे व्हिसेरा रिपोर्ट पुन्हा तपासणार कंगनाने ट्वीट केलं आहे, "बीएमसी अधिकारी जबरदस्ती माझ्या ऑफिसची तपासणी करत आहे. जेव्हा शेजाऱ्यांनी याबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांनी त्यांचाही छळ केला. 'त्या ज्या मॅडम आहे त्यांनी जे काही केलं आहे, त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील', अशी भाषा त्यांनी वापरली"
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bollywood, Kangana ranaut, Sanjay Raut (Politician)

    पुढील बातम्या