मुंबई,8 एप्रिल- 'आई कुठे काय करते'
(Aai Kuthe Kay Karate) ही मालिका पुन्हा एकदा रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत अरुंधतीसमोर
(Arundhati) दररोज नवीन संकटे येऊन उभी राहतात. मात्र या सर्वांवर ती आत्मविश्वासाने मात करताना दिसत आहे. दरम्यान आता अनिरुद्धची
(Anirudha) आई कांचन पुन्हा अरुंधतीकडे आलेली आहे. ती हात जोडून अरुंधतीला विनंती करताना दिसत आहे. पाहूया नेमकं काय घडलंय.
'आई कुठे काय करते' या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये कांचन अरुंधतीसमोर हात जोडताना दिसत आहे. त्यामुळे नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून आहे. सध्या हा नवा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
वास्तविक पाहता, संजनाच्या खेळीमुळे अरुंधतीच्या घरात पुन्हा जोराचा वाद होतो. यावेळी अनिरुद्धची आई अर्थातच अरुंधतीची सासू आणि आप्पामध्येसुद्धा टोकाचा वाद पाहायला मिळाला होता. यावेळी कांचन आप्पांचं प्रचंड अपमान करतात. यावेळी बोलताना त्या म्हणतात, हे घर तुमचंसुद्धा नाहीय. तुमचं असं या घरात काय आहे. हे घर,, हे साम्राज्य माझया मुलाने म्हणजेच अनिरुद्धने उभं केलंय. त्यांच्या या बोलण्याने अरुंधतीसह सर्वानांच धक्का बसतो. त्यामुळे आप्पासुद्धा घर सोडून जाण्याचा निर्णय घेतात. ते अरुंधतीसोबत तिच्या घरी जातात.
नव्या प्रोमोमध्ये दाखविण्यात आलं आहे. कांचन यांना आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. सोबतच अनिरुद्ध घरी परतल्यानंतर त्याला हा प्रकार समजतो. तो सर्वांवर चांगलाच भडकलेला दिसत आहे. त्याने आप्पा माझं सर्वस्व असल्याचं सांगत त्यांना घरी परत आणण्याचा आदेश दिला आहे. दुसरीकडे कांचन अरुंधतीला भेटायला गेल्या आहेत. आप्पाना देशमुख कुटुंबात परत आण्यासाठी त्या अरुंधतीसमोर हात जोडून विनंती करत आहेत. यावर अरुंधतीसुद्धा त्यांना वचन देताना दिसून येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.