कंगना रणौत लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत? साखरपुड्याचा VIDEO VIRAL

कंगना रणौत लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत? साखरपुड्याचा VIDEO VIRAL

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 09 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. नुकतंच कंगनाच्या घरी साखरपुड्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यात तिनं बहीण रंगोलीसोबत खूप एंजॉय केलं. त्या कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण चकीत होऊ नका हा साखरपुडा कंगनाचा नाही तर तिच्या भावाचा होता. कंगनाच्या घरी लवकरच तिच्या वहिनीचं आगमन होणार आहे. तिचा भाऊ अक्षत रणौतनं त्याची गर्लफ्रेंड डॉक्टर ऋतूसोबत नुकताच साखरपुडा आटोपला. लवकरच हे दोघंही लग्नाच्या बेडीत अडकतील.

कंगना तिच्या भावाच्या लग्नात गोल्डन रंगाच्या साडीमध्ये दिसली. यावेळी तिनं तिच्या कुटुंबीयांसोबत खूप एंजॉय केलं. भावाच्या साखरपुड्यानंतर झालेल्या पार्टीत शॅम्पेनची बॉटल ओपन करतानाचा कंगनाचा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

सनी लियोनीने केला 'लैला मैं लैला' गाण्यावर डान्स, Video Viral

अक्षत रणौतचे फोटो कंगनाची बहीण रंगोलीनं ट्विटर अकाउंटवर शेअर केले. तसेच इन्स्टाग्रामवरही कंगनाच्या ऑफिशिअल पेजवर काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्यानंतर हे फोटो सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार ऋतू आणि अक्षत मागच्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर आता ते ऑफिशिअली नात्यात अडकले आहेत. या कार्यक्रमात कंगनानं तिच्या काही जवळच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला आमंत्रित केलं होतं. ज्यात बॉलिवूडमधील कोणत्याही सेलिब्रेटीचा समावेश नव्हता. हा कार्यक्रम फक्त कौटुंबिक पातळीवर पार पडला.

Pagalpanti: 'बीमार दिल' गाण्यात उर्वशी रौतेलाचा 'हॉट' अवतार, पाहा PHOTOS

मुंबईत हॉटेलमध्ये भांडे धुणाऱ्या मुलाला Indian Idolने बनवलं स्टार!

=============================================================

VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात

Published by: Megha Jethe
First published: November 9, 2019, 8:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading