VIDEO भाई : पु.ल. भीमसेन, कुमार आणि वसंतराव पडद्यावर साकारणार हे चेहरे; पहिलीच मैफल 'व्हायरल'

VIDEO भाई : पु.ल. भीमसेन, कुमार आणि वसंतराव पडद्यावर साकारणार हे चेहरे; पहिलीच मैफल 'व्हायरल'

पुलंवरचा सिनेमा 'भाई व्यक्ती की वल्ली' रिलीजसाठी सज्ज आहे. नुकतंच त्यातलं एक गाणं रिलीज झालंय. 'कानडा राजा पंढरी'चा हे गाणं नव्यानं सिनेमात पाहायला मिळणार आहे.

  • Share this:

मुंबई, 29 डिसेंबर : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे.  त्यांचं व्यक्तिचित्रण किती खुसखुशीत असू शकतं, कथेतील  प्रत्येक पात्र वाचकाला किती भुरळ घालू शकतात, हे ज्यांच्या लिखाणशैलीतून कळतं. लिखाणाची शैली अशी अतरंगी की त्या व्यक्तीच्या प्रेमात माणूस पडतो.  हास्य आणि व्यंग यांचा अलौकिक ताळमेळ म्हणजे ही व्यक्ती. लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक दिग्दर्शक आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व जे खऱ्या अर्थाने  महाराष्ट्राचं भूषण होतं.

पुलंवरचा सिनेमा 'भाई व्यक्ती की वल्ली' रिलीजसाठी सज्ज आहे. नुकतंच त्यातलं एक गाणं रिलीज झालंय. 'कानडा राजा पंढरी'चा हे गाणं नव्यानं सिनेमात पाहायला मिळणार आहे. भाईंसमवेत कुमार गंधर्व, भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे यांच्या मैफलीत सुरू झालेला विठ्ठलाचा गजर तितकाच श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आहे. राहुल देशपांडे, जयतीर्थ मेवुंडी, भुवनेश कोमकली यांच्या सुरांची जादू या गाण्यात पाहायला आहे.

वायाकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'भाई – व्यक्ती की वल्ली' या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे, तर पटकथा गणेश मतकरी आणि संवाद रत्नाकर मतकरी यांचे आहेत, संगीत अजित परब यांचं आहे.

चित्रपटात पुलंची भूमिका सागर देशमुख साकारणार आहे.इरावती हर्षे हिने सुनीता बाईंची भूमिका साकारली आहे.पण सागर उमेदीच्या काळातले पुलं दाखवणार, तर सूत्रांच्या माहितीनुसार वयोवृद्ध पुलं साकारणार आहेत विजय केंकरे. आणि वृद्ध सुनीताबाई उभ्या करणार आहेत शुभांगी दामले. हा सिनेमा 4 जानेवारी 2019ला रिलीज होणार आहे.

Year Ender 2018 : अनाजी पंतांनी 'इथे'ही घातला धुमाकूळ!

First published: December 29, 2018, 2:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading