टि्वटर अकाऊंट सुरू करा नाहीतर आत्महत्या करेन, 'कमाल' नौटंकी सुरूच

टि्वटर अकाऊंट सुरू करा नाहीतर आत्महत्या करेन, 'कमाल' नौटंकी सुरूच

जर ट्विटर इंडियाने माझ ट्विटर अकाऊंट चालू केलं नाही तर मी आत्महत्या करेन आणि माझ्या मरण्याला ट्विटर इंडिया जबाबदार असेल.'

  • Share this:

02 नोव्हेंबर : आपल्या वादग्रस्त आणि आक्षेपार्ह ट्विट्समुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या कमाल खानने आता आणखी एक नौटंकी केलीये. त्याने आता आपलं टि्वटर अकाऊंट सुरू करावं अन्यथा माझ्या जिवाचं बरं वाईट झाल्यास त्याला टि्वटर इंडिया जबाबदार राहील अशी धमकीच दिलीये.

केआरके अर्थात कमाल खानला अलीकडेच ट्विटरने चांगलाच झटका दिला होता. त्याचं टि्वटर अकाऊंटचं सस्पेंड केलं होतं. असं सांगितलं जातं की, आमिर खानच्या 'सिक्रेट सुपरस्टार' सिनेमाच्या क्लायमॅक्सचे सीन कमाल खान याने आधीच उघड केल्याने ट्विटरने त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.

ट्विटरने घेतलेल्या या निर्णयावर चिडून कमाल खानने पत्रकार परिषद घेतली आणि त्यात ट्विटर इंडियाला धमकी दिली. त्यात तो म्हणाला की, 'जर ट्विटर इंडियाने माझ ट्विटर अकाऊंट चालू केलं नाही तर मी आत्महत्या करेन आणि माझ्या मरण्याला ट्विटर इंडिया जबाबदार असेल.'

यात त्यांने असंही लिहलं की, 'ट्विटर इंडियाच्या स्टाफ मिस, महिमा कौल, विरल जानी आणि तरनजीत सिंह यांना मी विनंती करतो की त्यांनी माझे ट्विटर अकाऊंट परत चालू करावे आधी त्यांनी मला लाखोंचा दंड भरण्यास सांगितला आणि आता अचानक त्यांनी माझ ट्विटर अकाऊंट बंद केलं. त्यांनी मला दगा दिला. मी यामुळे खूप अस्वस्थ आहे. जर माझ ट्विटर अकाऊंट परत चालू नाही केलं तर मी आत्महत्या करेनं आणि त्याला जबाबदार ट्विटर इंडिया असेलं.'

आता कमालच्या या ढोंगीपणावर ट्विटर इंडिया काय प्रतिक्रिया देतं हे पाहण महत्वाचं आहे.

First published: November 2, 2017, 6:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading