अरे देवा! या अभिनेत्याला कुणीतरी आवरा, महाभयंकर Coronavirus भारतात यावा अशी केली प्रार्थना
WHO ने Coronavirus बाबत संपूर्ण जगामध्ये Health Emergency जाहीर केली होती. संपूर्ण जग कोरोनामुळे हादरलं असताना बॉलीवूड अभिनेता कमाल आर खानला असं वाटत आहे की, कोरोना भारतात दाखल व्हावा.
मुंबई, 3 मार्च : मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणतात. पण एखाद्याच्या मनात इतका वाईट विचार कसा काय येऊ शकेल असंच तुम्हाला ही बातमी वाचून वाटेल. चीनमध्ये Coronavirus ने थैमान घातलं आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जगभरात 88,000 हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे तर 3 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये कोरोनाचे 6 रूग्ण आढळून आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या संसर्गजन्य रोगास COVID-1 असं नाव दिलं आहे. WHO ने याबाबत संपूर्ण जगामध्ये Health Emergency जाहीर केली होती. संपूर्ण जग कोरोनामुळे हादरलं असताना बॉलीवूड अभिनेता कमाल आर खानला असं वाटत आहे की, कोरोना भारतात दाखल व्हावा.
केआरके अर्थात कमाल आर खान सोशल मीडियावर बऱ्याचदा वायफळ मतं मांडत असतो. अनेकदा तो ट्रोलर्सकडून ट्रोलदेखील होतो. काही वेळा तो त्याच्या ट्वीटमुळे अडचणीत सापडला आहे. त्याच्या वादग्रस्त ट्वीटमुळे ट्रोलर्सची शिकार बनला आहे.या ट्वीटमधून केआरके असं म्हणाला आहे की, ‘मी देवाकडे प्रार्थना करतो की, कोरोना व्हायरस भारतामध्ये येऊ दे. कदाचित त्यामुळे हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन हे सर्व भाऊ कोरोनाविरोधात एकत्र लढतील'. केआरकेने याठिकाणी धार्मिक ऐक्य दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेक ट्विटर युजर्सना त्याचं कोरोना विषाणूबाबतचं वक्तव्य रूचलं नाही आहे.
I pray to GOD for the #caronavirusoutbreak in India as soon as possible. May be, we all Hindu Muslim Sikh Christians become brothers again to fight against #coronavirus!
नुकतंच कमल आर खानचे 'तुम मेरी हो' हे गाणे प्रदर्शित झालं होतं. त्यांच्या गाण्यांवर अमिताभ बच्चन आणि हृतिक रोशन सारख्या कलाकारांनीही प्रतिक्रिया दिली. कमलने देशद्रोही या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. चित्रपट चालला नाही परंतु कमल आपली छाप सोडण्यात यशस्वी झाला. कमल रियलिटी शो बिग बॉसमध्येही दिसला आहे.