#MeTooच्या लाटेतही असं होणं दुर्दैवी : अक्षरा हासनची वादग्रस्त फोटोंबद्दल अखेर तक्रार

#MeTooच्या लाटेतही असं होणं दुर्दैवी : अक्षरा हासनची वादग्रस्त फोटोंबद्दल अखेर तक्रार

सुपरस्टार कमल हासन यांची मुलगी अक्षरा हासन हिनं अखेर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार नोंदवली आहे. अक्षरा हासनचे हे प्रायव्हेट 'PHOTOS' सोशल मीडियावर लीक झाले होते.

  • Share this:

मुंबई, ९  नोव्हेंबर : सुपरस्टार कमल हासन यांची मुलगी अक्षरा हासन हिनं अखेर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार नोंदवली आहे. अक्षराची काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. तिचे काही प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक करण्यात आले होते. तिला यावरून बरंच ट्रोल करण्यात आलं होतं.

तिच्या या अर्धनग्न फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं. अक्षराच्या या फोटोंमध्ये ती अंडरगार्मेंट्सवर सेल्फी घेताना दिसते आहे.

पण या फोटोत खरंच अक्षरा आहे की फोटोंसोबत छेडछाड करण्यात आली आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.

अक्षरानं नोंदवलेल्या तक्रारीनुसार, कुण्या एका व्यक्तीनं तिचे हे खासगी फोटो सोशल मीडियावर लीक केले. हे कृत्य कुणी, कधी आणि कसं केलं याविषयी मला काही माहिती नाही, कल्पना नाही. पण हे खूपच दुर्दैवी आहे, असं अक्षरा म्हणाली. मुंबई पोलिसांनी मला या गैरकृत्य करणाऱ्याला शोधायला मदत करावी, अशी विनंती अक्षरानं पोलिसांकडे केली आहे.

कमल हासनच्या मुलीचे हे प्रायव्हेट 'PHOTOS' सोशल मीडियावर लीक

अक्षराच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर क्राईम ब्रँचनं गुन्हा नोंदवला आहे. आता या व्यक्तीचा तपास घेण्यात येईल.  अक्षराची मोठी बहीण आणि अभिनेत्री श्रुती हासन हिनेसुद्धा अक्षराचं ट्वीट रीट्विट केलं आहे.

एकीकडे #MeToo ची मोहीम जोरदार असतानाही हे गैरकृत्य होणं दुर्दैवी आहे. केवळ कुणाच्या नेत्रसुखासाठी हे असं तरुण मुलीला तिचे खासगी फोटो सार्वजनिक करून छळणं भयंकर आहे, असं अक्षराचं म्हणणं आहे.

सुपरस्टार कमल हासन आणि अभिनेत्री सारिका यांची अक्षरा ही धाकटी कन्या. ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकलेली आहे. तिने शमिताभ नावाच्या सिनेमातून बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केलं आहे. दक्षिणेतला सध्याचा लोकप्रिय अभिनेता धनुष याच्या बरोबर तिने हा हिंदी चित्रपट केला होता.

'बर्निंग कार' रस्त्यावर धावत होती, VIDEO व्हायरल

First published: November 9, 2018, 12:58 PM IST

ताज्या बातम्या