कमल हसनच्या 'विश्वरुपम 2'चं पोस्टर रिलीज

कमल हसनच्या 'विश्वरुपम 2'चं पोस्टर रिलीज

कमल हसन यांचा बहुप्रतीक्षित सिनेमा आणि 'विश्वरुपम' या सिनेमाचा सिक्वेल 'विश्वरुपम 2' यावर्षी प्रदर्शित होणार आहे.

  • Share this:

02 मे : कमल हसन यांचा बहुप्रतीक्षित सिनेमा आणि 'विश्वरुपम' या सिनेमाचा सिक्वेल 'विश्वरुपम 2' यावर्षी प्रदर्शित होणार आहे.

कमल हसन लिखित दिग्दर्शित हा सिनेमा एक स्पाय थ्रिलर असेल. यात कमल हसनसोबत राहुल बोस, शेखर कपूर, पूजा कुमार हे कलाकारदेखील आहेत. तामिळ आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या सिनेमाचं पहिलं पोस्टर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झालंय.

विश्वरुपम 2 हा सिनेमा येत्या ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होईल अशी चर्चा आहे. लवकरच प्रदर्शनाची तारीखही जाहीर होईल. त्यामुळे कमल हसन यांच्या चाहत्यांना तूर्तास वाट पहावी लागेल.

2013 मध्ये विश्वरुपम हा पहिला भाग प्रदर्शित झाला होता जो तामिळ सिनेमांमध्ये तेव्हा सर्वाधिक कलेक्शन असणारा दुसरा सिनेमा ठरला होता. विश्वरुपमला दाक्षिणात्य प्रेक्षकांनी पसंतीचा कौल दिला होता त्यामुळे 'विश्वरुपम 2' कडून अपेक्षा वाढल्या आहेत. कमल हसनचा हा 'लार्जर दॅन लाईफ स्पाय थ्रिलर' कसा असेल याची उत्सुकता वाढली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2017 10:19 PM IST

ताज्या बातम्या