कमल हासनची पूर्वाश्रमीची पत्नी सारिकानं आमिर खानकडे का मागितली मदत?

कमल हासनची पूर्वाश्रमीची पत्नी सारिकानं आमिर खानकडे का मागितली मदत?

कमल हासनची पूर्वाश्रमीची पत्नी सारिकानं चक्क आमिर खानकडे मदत मागितलीय. सध्या तिची आर्थिक स्थिती बरोबर नाही. ती प्राॅपर्टीच्या वादात अडकलीय.

  • Share this:

19 डिसेंबर : कमल हासनची पूर्वाश्रमीची पत्नी सारिकानं चक्क आमिर खानकडे मदत मागितलीय. सध्या तिची आर्थिक स्थिती बरोबर नाही. ती प्राॅपर्टीच्या वादात अडकलीय.

झालं असं की सारिकाचा जुहूला फ्लॅट आहे. भानू अपार्टमेंट्स. तिथेच गोविंदा आणि विवेक ओबेराॅयही राहतायत. नोव्हेंबरमध्ये सारिकाच्या आईचं निधन झालं. मृत्यूपूर्वी आईनं फ्लॅट कोणा डाॅक्टर ठक्करच्या नावे केला. आता तो फ्लॅट सारिकानं खरेदी केला असला तरी आईचाही त्यावर हक्क होता, असं सारिकाचं म्हणणं आहे. आणि आईनं हा व्यवहार परस्पर केला.

आता सारिका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहते. कमल हासनशी घटस्फोट झाल्यावर ती मुंबईत आली. सारिकाची मोठी मुलगी श्रुती हासनचा स्वत:चा मुंबईत फ्लॅट आहे. तर छोटी अक्षरा चेन्नई आणि मुंबईत जा-ये करत असते.

First published: December 19, 2017, 7:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading