मुंबई 24 जून: कमल हासन (Kamal Haasan) हे भारतीय सिनेसृष्टीतील एक अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखले जातात. अभिनय, संगीत, दिग्दर्शन, निर्मिती अशा विविक्ष क्षेत्रात त्यांनी दर्जेदार कामगिरी केली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तर एखाद्या देवाप्रमाणे त्यांची पूजा केली जाते. असाच एक प्रसंग नुकताच घडला. एका कर्करोगग्रस्त चाहत्याला त्याची शेवटची इच्छा म्हणून कमल हासन यांना भेटायचं होतं. (Battling brain cancer) त्यांनी देखील मोठ्या उत्साहानं आपल्या या चाहत्याची भेट घेतली. त्यांच्या या ऑनलाईन भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
कमल हासन यांच्या या चाहत्यानं नाव साकेत असं आहे. त्याला मेंदूचा कर्करोग झाला आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं त्याचावर उपचार सुरु आहेत. शिवाय येत्या काळात त्याची एक मोठी शस्त्रक्रिया देखील केली जाणार आहे. परंतु यामध्ये तो वाचेल का? त्याची शस्त्रक्रिया यशस्वी होईल का? याबाबत साकेतच्या मनात संशय आहे. म्हणून मृत्यूपुर्वी त्याची शेवटची इच्छा पूर्ण करावी अशी विनंती त्यानं डॉक्टरांना केली. त्याला कमल हासन यांना भेटायचं होतं.
...म्हणून सुमोना चक्रवर्ती कपिल शर्माला घालायाची शिव्या; केला धक्कादायक खुलासा
View this post on Instagram
नसीब चित्रपटातील क्लायमॅक्स कसा शूट केला? 40 वर्षानंतर बिग बींनी सांगितलं गुपित
यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी एक सोशल मीडिया पोस्ट केली होती. या पोस्टची नोंद घेत कमल हासन यांनी त्याची इच्छा पुर्ण केली. त्यांनी व्हिडीओ कॉलिंगद्वारे त्याच्याशी संपर्क साधला. बराच वेळ त्यांनी साकेतसोबत गप्पा मारल्या. शिवाय त्याला कर्करोगाविरोधात लढण्याची प्रेरणा देखील दिली. “तू लवकरच ठिक होशील. अन् ऑपरेशननंतर हॉस्पिटलमध्ये येऊन मी तुझी भेट घेईन.” असं आश्वासन त्यांनी साकेतला दिलं. त्याच्या या ऑनलाईन भेटीचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.