मुंबई, 24 मार्च : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आल्या. त्यांनी त्यांच्या कामानं आपली ओळख निर्माण केली. प्रोफेशनल आयुष्यात त्या यशस्वी ठरल्या मात्र पर्सनल आयुष्यात त्यांना कोणी साथ देईना अशी अवस्था त्यांची झाली. अशीच एक अभिनेत्री म्हणजे सारिका ठाकुर. 2022मध्ये आलेल्या 'ऊंचाई' सिनेमात कलाकारांची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. बिग बी अमिताभ बच्चन, अनुपम खेर, डॅनी डेन्जोपा आणि बोन इराणीसह अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत होते. सिनेमात आणखी एका कलाकारांनी सर्वाचं लक्ष वेधलं ती म्हणजे अभिनेत्री सारिका ठाकुर. सारिका म्हणजेच अभिनेता कमल हासनची पहिली बायको. बॉलिवूडमध्ये सारिकाच्या वाट्याला अनेक मोठे सिनेमे आले.
अभिनेत्री सारिका ठाकुरनं बॉलिवूडमध्ये 'रजिया सुल्तान', 'बडे दिल वाले', 'कैसे कैसे लोग', 'नास्तिक' आणि 'मैं कातिल हूं' सारख्या सिनेमात काम केलं. 1981मध्ये आलेल्या 'क्रांती' सिनेमात सागरिका दिसली. प्रोफेशनल आयुष्यात सागरिकानं अनेक ओळखी केल्या अनेक माणसं कमावली. पण वैयक्तिक आयुष्यात सागरिका एकटी पडली. सारिकाचं वैयक्तिक आयुष्य अनेक खाच खळग्यांनी भरलेलं होतं. वैयक्तिक आयुष्यात तिनं प्रचंड दु:ख सहन केलं आहे.
हेही वाचा - दरवाजा तोडून बाहेर काढावा लागला मृतदेह; मृत्यूच्या काही तास आधी गुरू दत्तबरोबर नेमकं काय घडलं?
5 ऑक्टोबर 1960मध्ये दिल्लीमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात सारिकाचा जन्म झाला. 5 वर्षांची असताना सारिकाचे वडील वारले. त्यानंतर तिच्या आईनं तिला कुटुंबाची जबाबादारी उचलली. 5 वर्षांच्या सारिकाला तिची आई अभिनय क्षेत्रात घेऊन आली. 1967मध्ये सारिकानं 'मझली दीदी' या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केलं.सारिकाच्या सुंदर निळ्या डोळ्यांवर प्रेक्षकही फिदा झाले. त्यानंतर आलेल्या 1976मध्ये रक्षाबंधन या सिनेमातही तिनं काम केलं. सारिकानं सलग हिट सिनेने बॉलिवूडला दिले. 80च्या दशकात सारिका बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री होती. अभिनय क्षेत्रात नाव मोठं होत असताना तिची ओळख अभिनेते कमल हासनबरोबर झाली आणि तिचं आयुष्य बदललं.
कमल हासन आणि सारिका भेटले तेव्हा कलम हसत विवाहीत होते. पण त्यांच्या लग्नात खूप ताण तणाव होते. त्यामुळेच ते सारिकाबरोबर जोडले गेले. अनेक वर्ष ते रिलेशनमध्ये होते. अनेक चढ उतार आले आणि अखेर 1988मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर दोघांना दोन मुलं झाली. मोठी मुलगी अभिनेत्री श्रृती हासन आणि अक्षरा हासन. मुलांच्या जन्मानंतर दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. 2002मध्ये सारिका आणि कमल हसन यांनी घटस्फोट घेतला.
सारिकाचं बालपण आधीच फार कष्टात आणि दुख:त गेलं होतं. खूप मेहनतीतून त्यांनी आयुष्य उभं केलं होतं. प्रचंड संघर्षातून सारिकाला प्रेम मिळालं होतं पण ते देखील फार वर्ष टिकलं नाही. दोघांनी घटस्फोट करत त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला. घटस्फोटानंतर सारिकाला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. हातात केवळ 60 रुपये उरले होते. उद्याच्या खाण्याची चिंता सतावत होती.
सिम्मी अग्रवालच्या एका जुन्या मुलाखतीत सरिकानं सांगितलं होतं की, "मी तेच केलं जे माझ्या आईसाठी चांगलं होतं. घटस्फोटोनंतर माझं जगणं मुश्किल झालं. माझ्या केवळ 60 रुपये आणि एक गाडी होती. दुसऱ्या दिवशी मी काय खाणार याची देखील सोय नव्हती. मी माझ्या मैत्रिणीच्या घरी काही दिवस काढले".
तर अभिनेता कमल हसन यांना देखील एका मुलाखतीत तुम्ही सारिकाला मदत का नाही केली? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावर त्यांनी म्हटलं होतं की, "मला तिच्या आर्थिक परिस्थितीचा काहीच अंदाज नव्हता.माझी सारिकाबरोबर मैत्री झाली. त्यानंतर तिची परिस्थिती कळल्यानंतर मला तिच्याबद्दल सहानभूती निर्माण झाली. सारिकाला कधीच कोणाकडून मदत घेण्यास तयार नव्हती. ती स्वाभिमानी होती. तिची ही गोष्ट मला खूप आवडायची म्हणून मी तिच्या प्रेमात पडलो"
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News