S M L

'विश्वरूपम 2'मधून पाकिस्तान, अल्लाह हे शब्द काढायला लावले

कमल हासनचा बहुचर्चित विश्वरूपम 2 आज रिलीज झालाय. त्याच्या हिंदी आवृत्तीत 14 कट्स आहेत. त्यात आयएफएस आणि फाॅरिन सर्विस हे शब्द डिलिट करायला सांगितले.

Updated On: Aug 10, 2018 05:00 PM IST

'विश्वरूपम 2'मधून पाकिस्तान, अल्लाह हे शब्द काढायला लावले

मुंबई, 10 आॅगस्ट : कमल हासनचा बहुचर्चित विश्वरूपम 2 आज रिलीज झालाय. त्याच्या हिंदी आवृत्तीत 14 कट्स आहेत. त्यात आयएफएस आणि फाॅरिन सर्विस हे शब्द डिलिट करायला सांगितले. बुरखा फाडण्याच्या दृश्यावर कात्री लावली गेली, तर चुंबन दृश्यही कापलं गेलंय. तामिळ 'विश्वरूपम 2'मध्ये अगोदर तर 22 कट्स सुचवलेत. त्यातला अल्लाह, पाकिस्तान, बास्टर्ड, भारतमाता, साऊथ ब्लाॅक, बाबू हे शब्द काढायला सांगितले. पाकिस्तान शब्द काढण्यामागचं कारण म्हणजे, फ्रेंडली रिलेशन असं दिलं गेलंय.

हेही वाचा

प्रियांका-निकचं 'फॅमिली प्लॅनिंग' सुरू!


अनुष्का-वरुण आलेत 'सुई धागा' घेऊन

PHOTOS : राधिकाची इच्छा होणार पूर्ण, शनायाच्या येणार नाकीनऊ

शिवाय एकाच देशात हिंदी आणि तामिळला वेगवेगळा न्याय लावला गेलाय. तामिळचे कट्स हिंदीत नाहीत. सेन्साॅर बोर्डाच्या या अजब कारभारावर सध्या सगळीकडे टीका सुरू आहे.

Loading...
Loading...

विश्वरूपम या सिनेमाचा हा सिक्वल आहे..या सिनेमात कमल हा रॉ एजंट वसीम एहमद कश्मिरीच्या भूमिकेत दिसणारे. जिहादी ओमर कुरेशी म्हणजेच राहुल बोस आणि अल कायदा न्यू यॉर्क शहरात मोठा विध्वंस करण्याचा कट आखतात. याद्वारे तीन देशातील लोकशाही उद्धस्त करण्याचा त्यांचा प्लॅन असतो.आता हा प्लॅन पूर्ण होऊ नये यासाठी वसीम काय काय करतो ते या सिनेमात पहायला मिळेल.

वेगवान कथानक, जबरदस्त अॅक्शन सीन्स अशी या सिनेमाची अनेक वैशिष्ट्य आहेत. कमल यांच्याशिवाय पूजा कुमार, अँड्रीया जेरेमिया, शेखर कपूर यांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. कमल हसन यांचे सिनेमे हे कायमच टिपिकल बॉलिवूड सिनेमांपेक्षा वेगळे असतात. विश्वरूपमच्या पहिल्या भागाला तामिळनाडूतील मुस्लीम संघटनांनी मोठा विरोध केला होता. त्यामुळे विश्वरूपम टू या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 10, 2018 05:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close