मुंबई, 12 फेब्रुवारी: अभिनेता कमाल आर खान (Kamaal R Khan) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने शेतकरी आंदोलनाच्या (Indian farmers protest) पार्श्वभूमीवरून मोदी सरकारवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे. गेल्या 70 वर्षातील हे पहिलं सरकार आहे ज्यांच्यापासून वाचण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतोय, असा टोला त्याने केंद्र सरकावर लगावला आहे.
कमाल खानने ट्वीट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
"गेल्या 70 वर्षांत अनेक सरकारं आली. ज्यांच्याकडे देशवासीय काहीना काही मागत होते. परंतु यावेळी इतिहासात पहिल्यांदाच असं सरकार आलंय ज्यांच्याकडे कोणी काहीही मागत नाही, उलट आपल्याकडे जे काही उरलंसुरलं आहे तेच वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय." अशा आशयाचं ट्वीट त्यानं केलं आहे.
हे वाचा - ब्रेकअप झालंय नो टेन्शन; अनन्या पांडेनं सांगितलं कसं कराल कसं कराल मुव्ह ऑन
पंतप्रधानांनी कृषी कायदाबद्दलच्या अनेक प्रश्नांना उत्तर दिली. त्यांनी तीन कृषी कायद्यांचं महत्त्व अधोरेखित करताना म्हटलं की, कृषी क्षेत्रात विविध सुधारणा होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करायला हवेत. पण कृषी कायद्यांबद्दल जास्तीत जास्त अफवा पसरवली जात आहे. विरोधकांनी कायद्याच्या अनुषंगाने चर्चा केली असती तर बरं झालं असतं, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
हे वाचा - सलमान आणि कॅटरिनासाठी इमरान हाश्मी झाला खलनायक, वाचा काय आहे कारण
पंतप्रधानाच्या भाषणांतील मुद्दावर काँग्रेस पक्षाने अनेक प्रश्न उपस्थित करत आक्षेप नोंदवला. त्यांनी पंतप्रधानांच्या भाषणाचा निषेध करत सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. यावेळी विरोधी पक्षाला टोला लगावताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस पक्षाने कृषी कायद्याच्या कलरपेक्षा त्यातील मजकूरावर चर्चा करायला हवी होती. त्यानंतर सभागृहात विरोधी पक्षाकडून गोंधळ करण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmers protest, Narendra modi