Home /News /entertainment /

KRKने आता या अभिनेत्याची उडवली खिल्ली; म्हणतो कसा, डबल ढोलकीचा सिनेमा बघायला जाणार का?

KRKने आता या अभिनेत्याची उडवली खिल्ली; म्हणतो कसा, डबल ढोलकीचा सिनेमा बघायला जाणार का?

अभिनेता कमाल आर खान (Kamal R Khan) त्याच्या वादग्रस्त पोस्ट्समुळे खूप चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा केआरकेने(KRK) एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्यावर निशाणा साधला आहे.यावेळी केआरकेने रणवीर सिंहच्या सिंह (Ranveer Singh) '83' चित्रपटावरून त्याच्यावर निशाणा साधला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 19 डिसेंबर - फिल्म क्रिटिक्स आणि अभिनेता कमाल आर खान (Kamal R Khan) त्याच्या वादग्रस्त पोस्ट्समुळे खूप चर्चेत असतो. सोशल मीडियाव केआरके बॉलीवूड सेलिब्रिटींवर नेहमी टीका करताना दिसतो. यामुळे अनेकदा तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतो. आता पुन्हा एकदा केआरकेने(KRK) एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्यावर निशाणा साधला आहे.यावेळी केआरकेने रणवीर सिंहच्या सिंह (Ranveer Singh) '83' चित्रपटावरून त्याच्यावर निशाणा साधला आहे. त्याने ट्विटरवर 83 चित्रपटाबद्दल एक पोल देखील केला आहे, ज्यामध्ये त्याने रणवीर सिंहची खिल्ली उडवली आहे. कमाल आर खानने कपिल देव यांच्या बायोपिक 83 बद्दल एक पोल शेअर केला आहे,. ज्यामध्ये 1983 मध्ये खेळल्या गेलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपची कथा सांगितली गेली आहे. ज्यामध्ये त्याने नेटकऱ्यांना एक प्रश्न देखील विचारला आहे. ज्यामध्ये त्याने रणवीर सिंहसाठी 'जोकर' आणि 'डबल ढोलकी' असे शब्द वापरले आहेत. वाचा : बुर्ज खलिफावर स्थान मिळालेला पहिला मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे या ट्विटर पोलमध्ये केआरकेने लिहिले आहे की, 'डबल ढोलकी आणि एक महान जोकर अभिनेता रणवीर सिंहचा चित्रपट 83 येत्या शुक्रवारी रिलीज होत आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात बघाल का? ' पोलच्या कप्शनमध्ये KRK ने चार पर्याय देखील दिले आहेत. ज्यामध्ये लिहिले आहे की, 'होय, नाही, फक्त टेलिग्रामवर आणि 30 दिवसांनंतर OTT वर.' वाचा : अभिजित बिचुकलेचा नवा ड्रामा; देवोलिनाकडे Kiss मागितल्यानंतर आता करायचंय सुसाईड केआरकेच्या या ट्विटवर यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. KRK च्या या पोलवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यामध्ये काही चित्रपटगृहात तर काही OTT वर पाहण्याबाबत बोलत आहेत. त्याचबरोबर काही जणांनी रणवीर सिंहला डबल ढोलकी आणि जोकर म्हणाल्याबद्दल चांगलच सुनावलं देखील आहे. kamaal r khan, kamaal r khan twitter यापूर्वी केआरकेने सलमान खान आणि मनोज बाजपेयीसोबतच्या मतभेदामुळे चर्चेत आला होता. मनोज बाजपेयींची सुपरहिट वेब सीरिज 'फॅमिली मॅन 2' रिलीज झाल्यानंतर कमाल आर खानने अनेक आरोप केले. चुकीची भाषा देखील वापरली होती. त्याचवेळी केआरकेने सलमान खानच्या राधेबाबतही अशीच भूमिका घेतली होती. त्यानंतर त्याला अनेक कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला होता.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Ranveer sigh

    पुढील बातम्या