लग्नाविना मूल होणार असल्याने कल्की झाली ट्रोल, अशा शब्दांत व्यक्त केली खंत

लग्नाविना मूल होणार असल्याने कल्की झाली ट्रोल, अशा शब्दांत व्यक्त केली खंत

कल्की पहिल्यांदाच आई होणार आहे. 'तुझा नवरा कुठंय' या शब्दांत तिला ट्रोल केलं गेलं, असं ती सांगते.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर : चित्रपट ताऱ्यांची अफेअर्स, ब्रेकअप्स आणि रिलेशनशिप्स याची चर्चा सोशल मीडियावर चवीने चघळली जाते. पण एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्यांच्या खासगीपणाचा अधिकारही जपला जात नाही, याबाबत अनेक सेलेब्रिटींनी अलिकडच्या काळात भावना व्यक्त केल्या आहेत. कल्की कोचलीन ही अशीच मोकळेपणाने व्यक्त होणारी अभिनेत्री.  कल्की सध्या गरोदर असून ती डिसेंबरमध्ये एका बाळाची आई होणार असल्याचं तिने नुकतंच जाहीर केलं.

कल्की पहिल्यांदाच आई होणार आहे. गाय हर्शबर्ग हा कल्कीचा बॉयफ्रेंड म्युझिशियन आहे. आपण गायशी लग्न केलेलं नाही, तरीही त्याच्या मुलाची आई होणार म्हणून आपल्याला खूप ट्रोल केलं गेलं, अशी खंत कल्कीने एका मुलाखतीत नुकतीच व्यक्त केली.

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत कल्की म्हणाली, 'या देशात अविवाहित राहून आई झालेल्या स्त्रीबद्दल लोक जजमेंटल होतात. टोकाच्या प्रतिक्रिया देतात. मी प्रेग्नंट असल्याचं कळल्यावर मला खूप ट्रोल केलं गेलं. माझा नवा कुठंय इथपासून ते टाईट कपडे घालू नको अशा फुकटच्या सल्ल्यांपर्यंत अनेकांनी मला सुनावलं.'

वाचा - 'दीपिकानं मला घरातून बाहेर काढण्याचा प्लान केला होता', आईचा धक्कादायक खुलासा!

या ट्रोलिंगचा परिणाम होतो का, यावर कल्की म्हणाली, मी या सगळ्याचा परिणाम माझ्यावर होऊ देत नाही. प्रेग्नंट नसेल तरी ट्रोल करणारे कमी नाहीत. मी ही टीका मनावर घेत नाही, असं ती सांगते. सगळेच काही त्रास देत नाही. माझे शेजारी, आप्त आवर्जून माझी चौकशी करतात. मला काय हवं-नको बघतात. त्यांच्यासाठी माझं लग्न झालंय की नाही याच्याशी काही घेणं देणं नसतं.

वाचा - अर्जुन कपूरआधी बॉलिवूडच्या या खानाशी जोडलं गेलं होतं मलायकाचं नाव

कल्की सध्या ZEE5 च्या भ्रम नावाच्या वेबसीरिजमध्ये दिसते आहे. येत्या डिसेंबरमध्ये ती बाळाला जन्म द्यायची शक्यता आहे. त्यासाठीचे तिचे प्लॅन्स तयार आहेत. बाळाच्या जन्मासाठी ती गोव्याला जाणार आहे. सध्या बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गचं संगीत ऐकत निवांत वेळ घालवण्याला कल्कीचं प्राधान्य आहे.

अन्य मनोरंजन बातम्या

KBC11 : शिक्षिका असूनही देऊ शकली नाही या सोप्या प्रश्नाचं उत्तर, जिंकले इतके लाख

‘बढ़ रही है नजदीकियाँ...’ विकी-कतरिनामधील वाढती जवळीक कॅमेऱ्यात कैद!

रिंकू राजगुरूचे दिवाळी सेलिब्रेशन; साडीतील फोटो पाहून चाहते झाले घायाळ!

======================================================================

VIDEO : ठाण्यात रंगली रेड्याची झुंज, स्पर्धा पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 10:47 AM IST

ताज्या बातम्या