कल्की कोचलिनच्या प्रेग्‍नन्सीवर Ex Husband अनुराग कश्‍यपने दिली ही रिअॅक्‍शन

कल्की कोचलिनच्या प्रेग्‍नन्सीवर Ex Husband अनुराग कश्‍यपने दिली ही रिअॅक्‍शन

अनुराग आणि कल्की यांनी 2011 मध्ये लग्न केलं होतं. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. अवघ्या दोन वर्षात दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि 2015 मध्ये त्यांचा घटस्फोटही झाला.

  • Share this:

मुंबई, 02 ऑक्टोबर- बॉलिवूड अभिनेत्री आणि अनुराग कश्यपची पूर्वाश्रमीची पत्नी कल्की कोचलिन लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी कल्कीने ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचं सांगितलं. दरम्यान, जेव्हा अनुरागला तिच्या गरोदरपणाबद्दल कळलं तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय होती याचा खुलासा तिने केला. अनुराग आणि कल्की यांनी 2011 मध्ये लग्न केलं होतं. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. अवघ्या दोन वर्षात दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि 2015 मध्ये त्यांचा घटस्फोटही झाला. दोघांमधलं पती- पत्नीचं नातं संपलं असलं तरीही दोघांमधली मैत्री कधी संपली नाही. नुकतंच सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनमध्ये दोघांनी एकत्र काम केलं.

 

View this post on Instagram

 

It's always a Sunday when I'm with my favourite caveman

A post shared by Kalki (@kalkikanmani) on

मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत कल्की म्हणाली की, जेव्हा अनुरागला तिच्या प्रेग्नंसीबद्दल कळलं तेव्हा त्याने कोणतीही मदत किंवा सल्ला लागल्यास संकोच न करता फोन करण्यास सांगितलं. त्याने 'पॅरेन्ट क्लबमध्ये' सहभागी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आणि कोणत्याही प्रकारची मदत लागली तर हक्काने फोन करण्याचंही सांगितलं. आलिया (अनुरागची मुलगी) आणि माझ्या छोट्या भावाला मोठं होताना पाहिल्यामुळे मला याची झलक याआधीच मिळाली आहे.

कल्कीने प्रियकर गाय हर्शबर्गच्या (Guy Hershberg) बाळाची आई होणार आहे. गाय हा इस्त्रायली संगीतकार, शिक्षक आणि पियानिस्ट आहे. सध्या तो मुंबईत राहत असून प्राण्यांसाठी काम करणाऱ्या एनजीओशी तो जोडला गेला आहे. त्याने येरुसलम अकादमीमधून पदवी घेतली आहे. कल्कीने गेल्या महिन्यात गायसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत दोघंही सुशी खाताना एकमेकांची कंपनी एन्जॉय करत होते. तर यावर्षी एप्रिल महिन्यात कल्कीने अजून एक व्हिडीओ शेअर केला होता. यात गाय पियानो वाजवताना दिसत होता. हा फोटो शेअर करून कल्कीने दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं मान्य केलं होतं.

महात्मा @ 150 : नाशिकमध्ये 30 फुटांचं धातू शिल्प उभं करून बापूंना अभिवादन

Published by: Madhura Nerurkar
First published: October 2, 2019, 6:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading