कल्की कोचलिननं केलं बेबी बंप फोटोशूट, पाहा PHOTO

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिन लवकरच आई होणार आहे. तिनं ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तिच्या प्रेग्नन्सीची माहिती चाहत्यांना दिली होती.

  • Share this:

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिन लवकरच आई होणार आहे. कल्कि तिचा इस्रायली पियानो वादक बॉयफ्रेंड गाय हर्शबर्ग याच्यापासून पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. तिनं ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तिच्या प्रेग्नन्सीची माहिती चाहत्यांना दिली होती.

कल्किनं ग्राझिया मासिकाच्या डिसेंबर महिन्याच्या कव्हरपेजसाठी हे खास फोटोशूट केलं असून यातील काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोशूटसाठी कल्किनं ऑफ व्हाइट कलरचा ड्रेस घातला होता. तिचा फॅशन सेन्स खूप चांगला हे या फोटोशूटमध्ये दिसून येतं. प्रेग्नन्सीमध्येही तिनं तिचं स्टाइल स्टेटमेंट व्यवस्थित सांभाळलं आहे.

हे फोटो शेअर करताना कल्किनं त्याला एक सुंदर कॅप्शन सुद्धा दिलं आहे. तिनं लिहिलं, स्वतःचं प्रतिनिधित्व करणं हे माझं काम आहे. माझं कामच माझ्यासाठी बोलेल.

कल्किनं जेव्हा पहिल्यांदा तिच्या प्रेग्नन्सीबद्दल सांगितलं त्यावेळी तिनं ती डिलिव्हरीसाठी वॉटरबर्थ पद्धतीचा वापर करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. दरम्यानच्या काळात तिनं बेबी बंपसोबत अनेक फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपपासून घटस्फोट घेतल्यानंतर कल्किनं सप्टेंबर 2019 मध्ये पहिल्यांदाच तिचा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबतच्या नात्याबद्दल सोशल मीडियावरुन माहिती दिली होती. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये तिनं ती आई होणार असल्याचं स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2019 01:55 PM IST

ताज्या बातम्या