Kalank: आलिया, सोनम आणि वरुणची प्रमोशनमधली मजा मस्ती एकदा पाहाच
कोणत्याही सिनेमाच्या यशात त्याचं योग्य प्रमोशन होणं फार महत्त्वाचं असतं. कलंकच्या टीमने प्रमोशनसाठी कंबर कसली असून यादरम्यान त्यांच्यातली मैत्रीही स्पष्ट दिसते.

कोणत्याही सिनेमाच्या यशात त्याचं योग्य प्रमोशन होणं फार महत्त्वाचं असतं. कलंकच्या टीमने प्रमोशनसाठी कंबर कसली असून यादरम्यान त्यांच्यातली मैत्रीही स्पष्ट दिसते. आलिया आणि वरुण एका रिअलिटी शोमध्ये सिनेमाच्या प्रमोशनला गेले होते.

यावेळी या दोघांसोबत सोनाक्षी सिन्हाही होती. या त्रिमुर्तीला एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी एक ट्रीट होती.

आलिया आणि वरुणने पारंपरिक कपड्यांना प्राधान्य दिलं तर सोनाक्षीने पारंपरिक आणि पाश्चात्यला पसंती दिली.

ब्लश पिंक अनारकलीमध्ये आलिया फार सुंदर दिसत होती. तर वरुणने घातलेला कुर्ता- पायजमा आणि त्यावरचं जॅकेट त्याला जास्तच कूल बॉय ठरवत होतं. पारंपरिक कपड्यांवर लेदरचे शूज घालून त्याने पाश्चिमात्य टचही दिला.

पण आलिया आणि वरुणपेक्षा सर्वांच्या नजरा या फक्त सोनाक्षी सिन्हावर खिळल्या होत्या. पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि प्रिन्टेंड आणि प्लेटेड शरारा पॅन्टवरून नजर हटत नव्हती. या सर्वावर साज चढवला तो तिच्या लांब बोहेमिअन जॅकेटने.

अभिषेक वर्माचं दिग्दर्शन असलेला कलंक हा सिनेमा येत्या १७ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.
First Published: Mar 26, 2019 06:48 AM IST