लोकांना आवडला नाही कलंकचा ट्रेलर, म्हणाले- ही तर भन्साळींची नक्कलच

लोकांना आवडला नाही कलंकचा ट्रेलर, म्हणाले- ही तर भन्साळींची नक्कलच

सिनेमाच्या टीझरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ट्रेलरकडून चाहत्यांना फार अपेक्षा होत्या. मात्र ट्रेलरबाबतीत नेमकं उलटं चित्र यावेळी दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, ३ एप्रिल- आलिया भट्ट आणि वरुण धवन यांचा ‘कलंक’ सिनेमा’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सिनेमाच्या टीझरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ट्रेलरकडून चाहत्यांना फार अपेक्षा होत्या. मात्र नेमकं उलटं चित्र यावेळी दिसत आहे. सिनेमाचा निर्माता करणने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला. पण ट्रेलरपाहून सकारात्मक प्रतिक्रिया येण्याऐवजी नकारात्मक प्रतिक्रियाच जास्त येत आहेत. युझर्सनी संजय लीला भन्साळींच्या सिनेमांची कॉपी केल्याचा ठपका करणवर लावला.एका युझरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, ‘हाहाहा... सर थोडं काही तरी वेगळं कायचं होतं. चित्रीकरण, पार्श्वसंगीत, क्लायमॅक्स सगळीच कॉपी आहे. हा सिनेमा तुमचा कमी आणि संजय लीला भन्साळी आणि आदित्य चोप्राची जास्त वाटते. संपूर्ण सिनेमा भन्साळींचा आणि क्लायमॅक्स आदित्य चोप्राचं वाटतंय.’सिनेमात भव्य दिव्य सेट दाखवण्यात आला आहे. संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात सामान्यपणे असे सेट असतात. अजून एका युझरने लिहिले की, ‘मला फार काही कळत नाही पण गेम ऑफ थ्रोन्सचं पार्श्वसंगीत कॉपी केल्यासारखं वाटतं.’ जेव्हा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता तेव्हा निर्मात्यावर संगीत चोरल्याचा आरोपही झाला होता. एकाने लिहिले की, ‘आलिया तर कुटुंबाची सदस्य आहे तर कोणत्याही सिनेमात तिला घ्या. तिला काम देण्यासाठी प्रत्येकवेळी हा पर्याय उपयोगी पडणार नाही.’यश चोप्रा यांचा हा महत्त्वाकांशी सिनेमा होता. ते हयात असतानाच त्यांना हा सिनेमा तयार करायचा होता. आता मुलाने आपल्या दिवंगत पित्याची इच्छा पूर्ण केली. ट्रेलरच्या शेवटी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेसारखा सीनही दिसतो. या सीनमध्ये आलिया ट्रेनच्या दरवाज्यावर उभी आहे. ट्रेन सुरू असते आणि आलिया वरुणला हात देण्यासाठी दारावर उभी राहते. तर वरुणही आलियापर्यंत पोहोचण्यासाठी धावताना दिस आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 3, 2019 06:51 PM IST

ताज्या बातम्या