VIDEO 'कलंक'चं टायटल साँग रिलीज, वरुण-आलियाच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीची चर्चा

VIDEO 'कलंक'चं टायटल साँग रिलीज, वरुण-आलियाच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीची चर्चा

'कलंक नहीं इश्क है काजल पिया' असे बोल असलेल्या या गाण्यात सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर यांचं स्पेशल बाँडिंगही दिसलं आहे.

  • Share this:

मुंबई, 30 मार्च : बहुचर्चित मल्टी स्टारर सिनेमा कलंकचा टायटल साँग आज रिलीज झालं. मागच्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या गाण्याच्या रिलीजविषयी निर्माता करण जोहरनं ट्विटरवरुन माहिती दिली. 'कलंक नहीं इश्क है काजल पिया' असे बोल असलेल्या या गाण्यातील आलिया भट आणि वरुण धवन यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आता सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. याशिवाय सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर यांचं स्पेशल बाँडिंगही या गाण्यात पाहायला मिळत आहे.

'कलंक नहीं इश्क है काजल पिया' हे गाणं प्रसिद्ध गायक अरजित सिंग आणि शिल्पा राव यांनी गायलं आहे. गाण्याची रचना गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांची असून संगीत प्रीमत यांनी दिलं आहे. कलंकच्या इतर दोन गाण्यांप्रमाणेच या गाण्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी तर या गाण्याला 'साँग आफ द इयर' म्हटलं आहे. या अगोदर या सिनेमातील 'घर मोरे परदेसिया' आणि 'फर्स्ट क्लास' ही दोन गाणी रिलीज झाली असून या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.

कलंकचा हा टायटल ट्रॅक शुक्रवारी (29 मार्च) रिलीज होणार होता. मात्र काही कारणाने तो ठरलेल्या वेळेत रिलीज होऊ शकला नाही. त्यामुळे करण जोहरनं सोशल मीडियावरुन चाहत्यांची जाहीर माफी सुद्धा मागितली. रिलीज होण्याआधीपासूनच या टायटल ट्रॅकविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली. अभिषेक वर्मा दिग्दर्शित कलंक येत्या 17 एप्रिलला सिनेगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात आलिया भट, वरुण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा अशी तगडी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिनेमाची निर्मिती करण जोहर आणि साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे.

First published: March 30, 2019, 5:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading