VIDEO-...आणि आलिया कपिल शर्माला म्हणाली, 'मर जाएगा तू'

VIDEO-...आणि आलिया कपिल शर्माला म्हणाली, 'मर जाएगा तू'

आलियानं कलंकच्या शूटिंग दरम्यानच्या अनेक आठवणी 'द कपिल शर्मा शो'मध्ये शेअर केल्या.

  • Share this:

मुंबई, 14 एप्रिल : निर्माता करण जोहरच्या 'कलंक'ची सध्या बॉलिवूड ते सोशल मीडिया सर्वत्रच जोरदार चर्चा आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून सिनेमाची संपूर्ण टीम सध्या कलंकच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे. यासाठीच सिनेमातील कलाकार आलिया भट, वरुण धवन , सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर यांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली. यावेळी संपूर्ण टीमनं कपिल शर्मासोबत खूप मजा-मस्ती सुद्धा केली. पण या दरम्यान आलिया कपिल शर्माला असं काही बोलली की, संपूर्ण सेटवर एकच हाशा पिकला.

 

View this post on Instagram

 

Catch your favorites @varundvn @aliaabhatt @aslisona @adityaroykapur tonight on #thekapilsharmashow @tkssofficial_ on @sonytvofficial #Kalank #tkss #KalankOnTkss

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

कपिल शर्मा शोमध्ये आलिया आणि वरुण प्रेक्षकांना हसवण्यात कपिलवरच वरचढ झालेले दिसले. फक्त 'कलंक' मध्येच नाही तर कपिल शर्माच्या शोमध्येही या दोघांमध्ये जबरदस्त बाँडिंग दिसून आलं. 'द कपिल शर्मा शो'च्या या एपिसोडचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कपिल हा वरुण आणि आलियाला एक टास्क म्हणून 'मुघल-ए-आझम'मधील एक सीन करायला सांगतो.

यावेळी कपिल जहाँपना, वरुण सलीम तर आलिया ही अनारकली होते. वरुण कपिलला सांगतो, जहाँपना मी अनारकलीवर खूप प्रेम करतो मला तिच्याशी लग्न करायचं आहे. तेव्हा कपिल त्याला लग्नाची परवानगी नाकारतो आणि सांगतो तू हिच्याशी लग्न करण्याचा विचार जरी केलास तर मी तिला मारुन टाकेन. यावर आलिया सांगते, 'सलिम और मेरे बीच काफी गुलूगुलू हैं, तू बीच में आएगा तो साइड में लेके धो डालूंगी मैं तेरेको'. पुन्हा कपिल आलियाला सलिमपासून दूर राहण्याची शपथ घ्यायला सांगतो. त्यावर आलिया सांगते, 'मर जाएगा तू...'

 

View this post on Instagram

 

^Alia if someone tries to come in between Varia 😂😂😂it’s so adorable and hilarious at the same time and look at VD just standing there letting her do her own thing🙈❤️ Watch the Kalank team on “The Kapil Sharma Show” this weekend🎬 for more follow us • @varia_ever_after •⁣⁣ •⁣ •⁣⁣ •⁣⁣ •⁣⁣ •⁣⁣ •⁣⁣ •⁣⁣ •⁣⁣ •⁣⁣ 🎞 tags: #varundhawan #aliabhatt #varia #kalank #sonakshisinha #adityaroykapoor #thekapilsharmashow #firstclass #kalanktrailer #tkss #kalankdiaries #bollywood #bollywoodmovie #otp #couple #bollywoodcouple #actor #actress #kalankmovie #kalankteaser #aliavarun #varunalia #couplegoals #kalanktitletrack #valia #variavalia #valiavaria #varunalia #varun #alia @varundvn @aliaabhatt

A post shared by ❥varia dreamland (@varia_ever_after) on

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ वरुण आलियाच्या फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. यात आलियाच्या हजरजबाबीपणानं कपिलचीच बोलती बंद झाल्याचं दिसतं. यावेळी आलियानं कलंकच्या शूटिंग दरम्यानच्या अनेक आठवणी शेअर केल्या. तसंच ती माधुरी दीक्षितसोबत काम करताना खूप नर्व्हस होती असंही तिनं सांगितलं.

बॉलिवूडमधील तगडी स्टारकास्ट असलेला बहुचर्चित 'कलंक' येत्या 17 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्तानं संजय दत्त आणि माधुरी दीक्षित तब्बल 22 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

First published: April 14, 2019, 1:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading