• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • भयानक आहे काजोलच्या या को-स्टारची कथा;वाढदिवसादिवशीच वडिलांनी केला होता आई-बहिणीचा खून

भयानक आहे काजोलच्या या को-स्टारची कथा;वाढदिवसादिवशीच वडिलांनी केला होता आई-बहिणीचा खून

प्रत्येकाला त्याचा वाढदिवस आनंदात घालवायचा असतो. अनेक जण पार्टी देऊन इतरांसोबत आनंद वाटून घेतात तर अनेक जण घरगुती पद्धतीने वाढदिवस साजरा करतात.

 • Share this:
   मुंबई,21ऑक्टोबर-  बॉलिवूडमध्ये यायचं आणि आपलं नशीब आजमावयचं हा गेल्या अनेक दशकांतील कलाकारांचा ध्यास राहिला आहे. मग देशातील कानाकोपऱ्यातून मुंबईत येऊन प्रचंड संघर्ष करून अनेक जण हे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करतात. काहींना यश येतं तर काहीजण अनेक वर्षं ज्युनिअर आर्टिस्ट म्हणूनच काम करतात. या मायानगरीवर काही हिरो राज्य करतात तर बिग बींसारखे महानायक त्याही पलीकडे आपली कारकीर्द घडवतात. काहींना पट्कन प्रसिद्धी मिळते आणि लगेच ते लोकांच्या स्मरणातून जातातही. असंच एक नाव आहे अभिनेता कमल सदाना याचं. कमल सदानाचा आज 21 ऑक्टोबरला 51 वा वाढदिवस आहे. प्रत्येकाला त्याचा वाढदिवस आनंदात घालवायचा असतो. अनेक जण पार्टी देऊन इतरांसोबत आनंद वाटून घेतात तर अनेक जण घरगुती पद्धतीने वाढदिवस साजरा करतात. पण कमलच्याबाबतीत त्याचा वाढदिवस त्याला भयंकर आठवणी करून देतो आणि त्याला दु:खच होतं. कमलने 1992 मध्ये काजोलसोबत 'बेखुदी' या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो काही चित्रपटांत दिसला होता पण फार प्रसिद्ध हिरो ठरू शकला नाही. बॉलिवूडमधले प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक असलेले कमलचे वडिल ब्रिज सदाना यांनी कमलच्या 20 व्या वाढदिवशी त्याची आई सईदा खान आणि त्याची बहीण नम्रता यांची बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या केली होती तसंच त्यांनी स्वत: वर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली होती. 21 ऑक्टोबर 1990 च्या दिवशी कमल आपला वाढदिवस साजरा करत होता तेव्हा अचानक त्याला त्याच्या घरात एका खोलीतून बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज आला. तो धावत त्या खोलीत गेला तर त्याचे वडिल बेभान होऊन गोळ्या झाडत होते. त्यांनी त्याची आई आणि बहीण दोघांचा खून केला होता आणि कमलवरही गोळी झाडली. तो थोडक्यात बचावला. नंतर त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत कमलने ही घटना सांगितली होती. तो म्हणाला होता की आमच्या कुटुंबाने चांगल्या पद्धतीने आर्थिक गुंतवणूक केली होती त्यामुळे प्रॉपर्टीचा काहीच वाद नव्हता माझ्या वडिलांनी अचानक असं पाऊल का उचललं समजत नव्हतं. (हे वाचा:VIDEO: मुलगा आर्यनला भेटण्यासाठी शाहरुख खान पोहोचला आर्थर जेलमध्ये) ब्रिज सदाना यांनी 'दो भाई', 'यह रात फिर ना आएगी', 'उस्तादों के उस्ताद', 'व्हिक्टोरिया नंबर 203', 'प्रोफेसर प्यारेलाल' या चित्रपटांची निर्मिती केली होती.कमलने 1992 मध्ये पदार्पण केल्यानंतर 1993 मध्ये दिव्या भारतोसोबत त्याचा रंग हा चित्रपट आला होता आणि जोरदार चाललाही होता. पण नंतर सततच्या अपयशामुळे कमलने बॉलिवूडला रामराम ठोकला होता. 2006 मध्ये ‘कसम से’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेतून त्यानी पुन्हा पदार्पण केलं होतं. 2014 मध्ये कमलने 'रोअर: टायगर्स ऑफ सुंदरबन' हा चित्रपट तयार केला होता.अजूनही कमलला त्याच्या पूर्वायुष्यातील घटना आठवून वाढदिवस क्लेषदायक जातो. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  First published: