मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Video: ‘प्रसिद्धीचा माज चढला आहे’; काजोलच्या उर्मटपणामुळे नेटकरी खवळले

Video: ‘प्रसिद्धीचा माज चढला आहे’; काजोलच्या उर्मटपणामुळे नेटकरी खवळले

सोशल मीडियावर अनेक लोकांनी तिला खडे बोल सुनावत राग व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर अनेक लोकांनी तिला खडे बोल सुनावत राग व्यक्त केला आहे.

“लक्षात ठेव तू चाहत्यांमुळेच मोठी झाली आहेस” अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

मुंबई 6 ऑगस्ट: काजोल (Kajol) ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. गेल्या काही काळात ती चित्रपटांमधून झळकली नसली तरी सोशल मीडियावर मात्र प्रचंड चर्चेत असते. (Kajol viral video) व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. मात्र याच चाहत्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे सध्या तिला जोरदार ट्रोल केलं जात आहे. (Kajol Troll) “लक्षात ठेव तू चाहत्यांमुळेच मोठी झाली आहेस” अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

‘या चुकीमुळे करिअरला लागला ब्रेक’; रश्मी देसाईनं केला धक्कादायक खुलासा

नेमकं घडलं काय?

5 ऑगस्ट रोजी काजोलचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्तानं काही चाहते केक घेऊन तिच्या घरी गेले. चाहत्यांनी आणलेला केक कापण्यासाठी काजोल घराबाहेर आली परंतु तिने सर्वांना दूर राहण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर तिने केक कापला. चाहत्यांनी तिला मास्क खाली करण्याची विनंती केली. परंतु तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत ती आता निघून गेली. हा व्हिडीओ तेथील काही मंडळींनी आपल्या कॅमेरात कैद केला अन् सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी प्रचंड खवळले आहेत. यांना प्रसिद्धीचा माज चढला आहे असं म्हत त्यांनी आपला राग व्यक्त केला.

‘कार घ्यायला पैसे आहेत पण कर भरायला नाही?’ न्यायालयाने धनुषला फटकारलं

सोशल मीडियावर अनेक लोकांनी तिला खडे बोल सुनावत राग व्यक्त केला आहे. एका युझरने लिहिले आहे, “ती बहुधा आता विसरून गेली आहे की, याच लोकांमुळे ती आज जिथे आहे तिथपर्यंत पोहोचली आहे. तिचे वागणे असे आहे की ती या लोकांवर फार मोठे उपकार करत आहे...'दुस-या एका युझरने लिहिले की, ' चाहत्यांना मान द्यावा असे या लोकांना का वाटत नाही. मला हे देखील कळत नाही की, लोक देखील त्यांच्या मागे का लागतात. या स्टार्सना भाव देणे बंद करा मग बघा कसे सरळ होतील...”

First published:
top videos

    Tags: Bollywood actor, Shocking video viral