मुंबई, 10 जानेवारी : अभिनेता अजय देवगण आणि काजोल ही सुपरहीट जोडी जवळपास 11 वर्षांनंतर ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या सिनेमातू एकत्र दिसणार आहे. या सिनेमात काजोल तानाजी मालुसरेंची पत्नी सावित्री बाईंची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा 10 जानेवारीला रिलीज होत आहे. त्यामळे काजोल आणि अजय या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. पण या दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत काजोलनं तिच्या आयुष्यातला एक दुःखद अनुभव शेअर केला.
एका इन्स्टाग्राम पेजनं त्याच्या एका पोस्टमध्ये काजोलबद्दल लिहिलं आहे. ‘कभी खुशी कभी गम’ सिनेमाच्या वेळी झालेल्या काजोलच्या मिसकॅरेजचा उल्लेख केला आहे. इन्स्टाग्रामवर पॉप्यूलर पेज ह्यूमन ऑन बॉम्बेला दिलेल्या मुलाखातीत काजोलनं सांगितलं, ‘मी आणि अजय 25 वर्षांपूर्वी हलचल सिनेमाच्या सेटवर भेटलो होतो. त्यावेळी आम्ही दोघंही वेगवेगळ्या व्यक्तींना डेट करत होतो. एक दिवस मी अजयकडे माझ्या बॉयफ्रेंडची तक्रार केली होती. त्यानंतर काही दिवसांत आमचं ब्रेकअप झालं. मी आणि अजय चांगले मित्र होतो. एकमेकांच्या जवळ येत होतो मात्र दोघांपैकी कोणीच एकमेकांना प्रपोज केलं नाही.’
काजोल पुढे म्हणाली, ‘मी आणि अजयनं जवळापास 4 वर्ष एकमेकांना डेट केलं. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. अजयच्या घरचे तयार झाले पण माझ्या निर्णयानंतर माझे वडील माझ्याशी 4 दिवस बोलत नव्हते. त्यांच्या मते मी कामावर लक्ष द्यायला हवं होतं पण माझा निर्णय झाला होता की मला लग्न करायचं आहे. आम्ही मीडियापासून बचाव करण्यासाठी त्यांना वेडिंग वेन्यू चुकीचा सांगितला.’
काजोलनं सांगितलं, ‘आम्हाला आमचं लग्न अतिशय खासगी पद्धतीनं करायचं होतं. त्यामुळे आम्ही घरीच लग्न केलं. पण आमचा हानीमून प्लान खूप मोठा होता. त्यामुळे आम्ही सिडनी, हवाई आणि लॉस एंजलेसला गेलो. पण तिथे अजय आजारी पडला आणि आम्ही भारतात परतलो. इजिप्तला जाण्याचा आमचा प्लान रद्द करावा लागला. त्यानंतर काही काळानं आम्ही मुलांचा विचार केला. ‘कभी खुशी कभी गम’च्या वेळी मी प्रेग्नन्ट होते पण त्यावेळी माझं मिसकॅरेज झालं. सिनेमा तुफान चालला होता मात्र मी हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर आणखी एकदा माझं मिसकॅरेज झालं. मी खूप दुःखी झाले होते. पण त्यानंतर काही वर्षांनी न्यासा आणि युगचा जन्म झाला. आम्ही दोघंही फार रोमँटिक नाही पण नेहमीच एकमेकांची काळजी घेतो.’