सासऱ्यांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा व्यक्त झाली काजोल, इन्स्टाग्रामवर लिहिली अशी पोस्ट

सासऱ्यांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा व्यक्त झाली काजोल, इन्स्टाग्रामवर लिहिली अशी पोस्ट

अजय यांचे वडील वीरु देवगण हे प्रसिद्ध स्टंट आणि अ‍ॅक्शन कोरिओग्राफर होते.

  • Share this:

मुंबई, 06 जून : काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचं निधन झालं. त्यांच्या अंत्यविधीला बॉलिवूडमधील जवळ-जवळ सर्वच कलाकार उपस्थित होते. यावेळी ऐश्वर्या राय बच्चनचा काजोलला धीर देतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. आपल्या सासऱ्यांच्या जाण्याचं काजोलला खूप दुःख झालं होतं पण आता मात्र काजोल या दुःखातून सावरत असून तिनं नुकतीच इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

काजोलनं तिच्या सासऱ्यांबद्दल एक भावूक पोस्ट वीरू देवगण यांच्या फोटोसह इन्स्टाग्रामवर शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, आजच्या दिवशीच त्यांना टाइफटाइम अचिव्हमेंटचा अवॉर्ड मिळाला होता. पण हे सिद्ध करायला त्यांनी पूर्ण जीवन व्यतीत केलं. पण ते हे जीवन खूप सुंदर पद्धतीनं जगले.

अजय यांचे वडील वीरु देवगण हे प्रसिद्ध स्टंट आणि अ‍ॅक्शन कोरिओग्राफर होते. त्यांनी ८० हून जास्त सिनेमांसाठी अ‍ॅक्शन कोरिओग्राफी केली आहे. याशिवाय ‘हिंदुस्तान की कसम’ नावाच्या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. फक्त अ‍ॅक्शन आणि दिग्दर्शनच नाही तर वीरू यांनी अभिनेता म्हणूनही अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं.

‘क्रांती’ (१९८१), ‘सौरभ’ (१९७९) आणि ‘सिंहासन’ (१९८६) या सिनेमांत त्यांनी अभिनयही केला होता. अ‍ॅक्शन दिग्दर्शक म्हणून त्यांचे ‘फूल और कांटे’, ‘हिम्मतवाला’, ‘प्रेम रोग’, ‘क्रांती’, ‘दो और दो पांच’ हे सिनेमे तुफान गाजले होते. देवगण कुटुंबावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगात त्यांचं सांत्वन करण्यासाठी अनेक बॉलिवूड मंडळी अजयच्या घरी पोहोचली होती.

SPECIAL REPORT : देवाच्या भक्ताची हंडाभर पाण्यासाठी वणवण, देवस्थानं कधी होणार जागे?

First published: June 6, 2019, 7:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading