मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

स्टेजवरच गेला काजोलचा तोल अन्...; पाहा अभिनेत्रीचा थ्रोबॅक VIDEO

स्टेजवरच गेला काजोलचा तोल अन्...; पाहा अभिनेत्रीचा थ्रोबॅक VIDEO

काजोल अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी तोल जाऊन किंवा घसरून पडल्याचं ऐकायला आणि पाहायला मिळतं. या अभिनेत्रीचे अनेक असे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायाला मिळतात.

काजोल अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी तोल जाऊन किंवा घसरून पडल्याचं ऐकायला आणि पाहायला मिळतं. या अभिनेत्रीचे अनेक असे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायाला मिळतात.

काजोल अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी तोल जाऊन किंवा घसरून पडल्याचं ऐकायला आणि पाहायला मिळतं. या अभिनेत्रीचे अनेक असे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायाला मिळतात.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,29 डिसेंबर-   मनोरंजन सृष्टीतील कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये  (Film Promotion)  व्यस्त असतात.आपल्या चित्रपटांसाठी ते सतत धावपळ करत असतात. अनेकवेळा प्रमोशनदरम्यान असे काही प्रसंग घडतात. ज्यामुळे या कलाकरांना पाहून तोंडातून  oopsss बाहेर पडत. असंच काहीसं झालं होतं प्रसिद्ध अभिनेत्री काजोलसोबत  (Kajol). काजोलचा हा थ्रोबॅक व्हिडीओ   (Kajol Throwback Video)   पाहिला तर तुम्हाला समजेल अभिनेत्रींसोबत नेमकं काय घडलं होतं.

काजोल ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. काजोलचा मोठा चाहतावर्ग आहे. ती आपल्या बबली पर्सनॅलिटीसाठी ओळखली जाते. परंतु अनेकवेळा काजोलसोबत सार्वजिनक ठिकाणी असे काही प्रसंग घडेल आहेत, ज्यामुळे ती लाजेनं चुर्रर्र झाली आहे. काजोल अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी तोल जाऊन किंवा घसरून पडल्याचं ऐकायला आणि पाहायला मिळतं. या अभिनेत्रीचे अनेक असे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायाला मिळतात. त्यातीलच एक व्हिडीओ आपण पाहत आहात. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. एखाद्या सेलिब्रेटीचे असे व्हिडीओ किंवा फोटो क्षणार्धात व्हायरल होतात. त्यामुळेच त्यांना फारच सांभाळून राहावं लागतं. मात्र शेवटी तेही माणूस असतात, त्यांनाही अशा काही प्रसंगाना सामोरं जावं लागतं.

" isDesktop="true" id="650285" >

हा व्हिडीओ तब्बल सहा वर्षांपूर्वीचा आहे. त्यावेळी हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. यामध्ये काजोल स्टेजवर अचानक कोसळू लागते. परंतु प्रसंगावधान राखत वरुण धवन काजोलला सावरतो. हा व्हिडीओ 'दिलवाले' या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे. या चित्रपटातून काजोल कित्येक वर्षानंतर अभिनेता शाहरुख खानसोबत पडद्यावर दिसली होती. या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन झालं होतं . यामध्ये काजोलही आवर्जून उपस्थित होती. असंच एके ठिकाणी या चित्रपटाचं प्रमोशन चालू होतं. दरम्यान चित्रपटातील इतर कलाकार मीडियाशी संवाद साधत असताना, त्यांच्यासोबत स्टेजवर उभी असलेली काजोल अचानक कोसळू लागते. अचानक झालेल्या या प्रसंगाने सर्वच घाबरतात. मात्र अतिशय जेंटलमन पद्धतीने तिच्या बाजूला उभा असलेला वरुण धवन त्याला सावरतो.

(हे वाचा:'ही तर नोरा फतेहीलासुद्धा टाकणार मागे'; काजोल-अजयची लेक न्यासा पुन्हा ट्रोल )

या प्रसंगाने काजोलसुद्धा घाबरलेली असते. स्टेजवरही सर्वजण तिला सावरू लागतात. त्यांनतर काजोल शांत होत स्वतःच हसू लागते. खरंतर काजोलचा तोल गेलेला असतो. त्यामुळे ती अचानक कोसळते. मात्र तिला काही इजा होण्यापासून वरुण वाचवतो. 'दिलवाले' हा चित्रपट प्रेक्षकांना फारच आवडला होता. कित्येक वर्षांनंतर त्यांना काजोल आणि शाहरुख खानची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. या चित्रपटात त्यांच्या व्यतिरिक्त वरुण धवन आणि क्रिती सेननसुद्धा होते. या चित्रपटातील गाणी चाहत्यांना फारच पसंत पडली होती.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment