काजोल आणि करणमध्ये आता आॅल इज वेल!

बाॅलिवूडमध्ये प्रत्येक स्टार्सची एक स्टाइल असते. अनेकदा तो अॅटिट्युड वाटतो इतरांनी. पण या कलाकारांमध्येही अनेकदा खूप मैत्री असते.

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2018 12:42 PM IST

काजोल आणि करणमध्ये आता आॅल इज वेल!

मुंबई, 28 आॅगस्ट : बाॅलिवूडमध्ये प्रत्येक स्टार्सची एक स्टाइल असते. अनेकदा तो अॅटिट्युड वाटतो इतरांनी. पण या कलाकारांमध्येही अनेकदा खूप मैत्री असते. आता काजोल आणि शाहरूखची मैत्री तर सर्वश्रुत आहे. पण करण जोहर आणि काजोलचीही खूप घट्ट मैत्री होती आणि अचानक त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. पण नुकताच काजोलनं स्पाॅटबाॅयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, ' आता आमच्यात काहीच प्राॅब्लेम नाही. सगळं ओके आहे.'

कुछ कुछ होता है सिनेमापासून काजोल आणि करण जोहर चांगले मित्र बनले. अनेक मुलाखतीत दोघांनी आम्ही एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहोत असं सांगितलं होतं. करण, काजोल, शाहरूख यांचं एक त्रिकुट बनलं होतं. मग दुरावा का आला?

2016मध्ये करण जोहरचा ऐ दिल है मुश्किल रिलीज होणार होता,  त्यावेळी अजय देवगणचे शिवाय सिनेमाही रिलीज होणार होता. करणनं शिवायचा रिव्ह्यू वाईट देण्यासाठी 25 लाख रुपये दिले, असा आरोप अजय देवगणनं केला होता.  त्यावरूनच काजोल आणि करणमध्ये दुरावा आला होता. पण आता आॅल इज वेल!

काजोल, शाहरूख खान यांची जोडी मोठ्या पडद्यावर चांगलाच रंग आणते. आणि त्यांना एकत्र आणण्याचं काम करण जोहर करत असतो. त्यामुळे हे त्रिकुट एकत्र असलं तर चांगलं काही तरी पाहायला मिळणार एवढं नक्की. नुकतंच एका पार्टीत या तिघांना एकत्र पाहिलं होतं. मग चर्चेला उधाणच आलं. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच हे तिघं सिनेमा करणार आहेत.

कळलेल्या माहितीनुसार करण जोहरनं शाहरूख-काजोलला स्क्रीप्ट ऐकवलंय. दोघंही त्यावर चर्चा करतायत. अजून सिनेमा साईन केलेला नाही. पण लवकरच प्रेक्षकांना काही तरी धमाका पाहायला मिळणार आहे, हे नक्की.

Loading...

PHOTOS : हेमामालिनी ते जान्हवी कपूर, लॅक्मे फॅशन वीकमध्ये स्टार्सचा जलवा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2018 12:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...