मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

"आता मला तिची खरी गरज आहे", जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर काजोल झाली भावुक

"आता मला तिची खरी गरज आहे", जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर काजोल झाली भावुक

अभिनेत्री काजोल देवगणने (kajol devgan) जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर इमोशनल पोस्ट केली आहे.

अभिनेत्री काजोल देवगणने (kajol devgan) जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर इमोशनल पोस्ट केली आहे.

अभिनेत्री काजोल देवगणने (kajol devgan) जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर इमोशनल पोस्ट केली आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 07 ऑक्टोबर : अभिनेत्री काजोल देवगणने (kajol devgan) आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे. त्यानंतर ती इमोशनल झाली आहे. ही जवळची व्यक्ती म्हणजे अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgan) भाऊ अनिल देवगण (Anil Devgan). अनिल देवगणचं 05 ऑक्टोबरला रात्री निधन झालं. अजय देवगणने काल त्याच्या निधनाची बातमी आपल्या सोशल मीडियावर दिली. आपल्या दीराला गमावल्यानंतर आता काजोलनेही इमोशनल पोस्ट केली आहे.

काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली. ज्यामध्ये तिने दुर्गा पूजा मंडपाचा फोटो शेअर केला आहे. यावर्षी देवगण कुटुंब उत्सव साजरा करणार नाही असं तिनं सांगितलं आहे.

काजोल म्हणाली, "यावर्षी पूजा होणार नाही. पण आईचं माझ्यावर लक्ष आहे. या परिस्थितीत तिची खरोखर मला गरज आहे". अशी पोस्ट करत काजोलने या कठीण परिस्थितीत खंबीर राहण्यासाठी देवीचा आशीर्वाद मागितला आहे.

हे वाचा - मलायकानंतर अर्जुन कपूरनेही केली कोरोनावर मात; चाहत्यांना केली कळकळीची विनंती

आपल्या भावाच्या अशा अचानक जाण्याने अजय देवगणही इमोशनल झाला. त्याच्या अशा अचानक जाण्याने आम्हा सर्वांनाच धक्का बसला आहे त्याची कमी मला नेहमी जाणवत राहिल,  त्याच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करा", असं ट्वीट त्याने केलं. कोरोना परिस्थितीमुळे शोकसभेचं आयोजन करणार नसल्याचंही अजय देवगणनं सांगितलं आहे.

अनिल देवगण हा प्रसिद्ध दिग्दर्शक होता.  दिग्दर्शक म्हणून त्याने करिअरला सुरुवात केली. फूल और काँटे, प्यार तो होना ही था अशा फिल्मसाठी तो सहाय्यक दिग्दर्शक होता. त्यानंतर राजू चाचा, ब्लॅकमेल, हाल ए दिल अशा फिल्मचं दिग्दर्शक केलं आहे. तसंच सन ऑफ सरदार फिल्ममध्ये तो क्रिएटिव्ह डायरेक्टर होता.

हे वाचा - अभिनेत्याच्या मृत्यूनंतरही पत्नीनं सोडली नाही साथ! पाहा Baby Showerचे PHOTOS

2020 सालात अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. 4 ऑक्टोबरला अभिनेते विशाल आनंद (vishan anand) यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजारपणामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खानचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. दिग्दर्शक निशिकांत कामत यांचंही आजारपणामुळे निधन झालं. संगीतदार वाजिद खानचाही किडनीच्या आजारामुळे मृत्यू झाला. गायक एसपी बालासुब्रमण्यम यांचा कोरोनामुळे काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. तर तरुण अभिनेता सुशांत सिंह राजपूतनेदेखील हे जग सोडलं.

First published:

Tags: Ajay devgan, Bollywood, Bollywood actress