लोक म्हणायचे काही दिवसही टिकणार नाही अजय- काजोलचं लग्न, आज आहे बॉलिवूडचं ‘हिट कपल’

करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये अजयने काजोलचं एक सिक्रेट सांगितलं.

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2019 09:00 AM IST

लोक म्हणायचे काही दिवसही टिकणार नाही अजय- काजोलचं लग्न, आज आहे बॉलिवूडचं ‘हिट कपल’

काजोलचा जन्म 5 ऑगस्ट 1974 मध्ये झाला. वयाच्या 16 व्या वर्षी तिने बेखुदी सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तेव्हा ती शाळेत शिकत होती. सिनेकरिअर करण्यासाठी तिने शिक्षण अर्धवट सोडलं. काजोलचं संपूर्ण कुटुंब हे सिनेसृष्टीत काम करणारं आहे.

काजोलचे वडील शोमू मुखर्जी हे प्रसिद्ध निर्माते- दिग्दर्शक होते. शोमू यांचे इतर भाऊही सिनेसृष्टीशी निगडीतच होते. काजोलची आई तनुजा, मावशी नूतना, आजी शोभना समर्थ आणि पणजी रतन बाई या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.

काजोलने 24 फेब्रुवारी 1999 मध्ये अजय देवगणशी लग्न केलं. 2001 मध्ये काजोलला मुलगी झाली. यानंतर तिने सिनेमांत काम करणं सोडून दिलं. नंतर 2010 मध्ये ती दुसऱ्यांदा आई झाली. काजोल- अजयने मुलीचं नाव न्यासा तर मुलाचं नाव युग ठेवलं.

अजय आणि काजोलची पहिली भेट सिनेमाच्या सेटवर झाली. जेव्हा अजयला काजोल आणि त्याच्या प्रेमाबद्दल विचारले तेव्हा अजय म्हणाला होता की, ‘मला स्वतःला नाही माहीत हे नक्की केव्हा सुरू झालं. मी कधी काजोलला प्रपोज केलं नाही. फक्त भेटी- गाठीमुळे नातं पुढे जात राहिलं. काजोलने अजयची तेव्हा साथ दिली जेव्हा तो स्वतः सिनेमांत स्ट्रगल करत होता.’

अजय आणि काजोल यांचा स्वभाव आणि राहणीमान एकमेकांच्या विरुद्ध आहे. हे पाहूनच लोकांनी यांचं लग्न फार काळ टिकणर नाही असं भाकीत केलं होतं. पण आज उत्तम जोडीदार कसा असावा आणि लग्नासाठी या दोघांचं उदाहरण दिलं जात आहे.

Loading...

करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये अजयने काजोलचं एक सिक्रेट सांगितलं. अजय म्हणाला की, काजोल दिवसभर ऑनलाइन शॉपिंग करत असते. ती विकत घेत असलेल्या वस्तूंची किंमत 500 ते 1500 रुपये असते. रोज घरी जवळपास 7 ते 8 वस्तू येत असतात.

अजय जेव्हा घरी जातो तेव्हा काजोल त्याला त्या सर्व गोष्टी दाखवते तसेच त्यांची किंमत सांगून ही वस्तू किती कमी किंमतीत विकत घेतली तेही सांगते.

लग्नाच्या 20 वर्षांनंतरही या दोघांमधलं बॉण्डिंग अप्रतिम आहे. अजय म्हणाला होता की, ‘मी आणि काजल फार कुल आहोत. आम्ही एकमेकांसोबत असे राहतो ज्यामुळे दुसऱ्याला अवघडल्यासारखं वाटणार नाही. आम्ही सगळ्या गोष्टी एकमेकांशी शेअर करू शकतो. आम्ही घरी असो किंवा बाहेर आम्ही तसेच असतो जसा आमचा मूळ स्वभाव आहे.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 09:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...