S M L

VIDEO : जेव्हा काजोल,माधुरीसमोर आशाताई गातात!

तुम्हाला त्यातलं काजोलचं जरासा झुम लू मै गाणं आठवत असेलच. हे गाणं, आशा भोसले आणि काजोल, शिवाय सोबतीला माधुरी दीक्षित... असा एकत्र सुवर्णयोग नुकताच आला होता.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2018 12:38 PM IST

VIDEO : जेव्हा काजोल,माधुरीसमोर आशाताई गातात!

मुंबई, 29 आॅगस्ट : दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे सिनेमा कोण विसरू शकेल? त्याच्यातली गाणी तर अजरामर झालीयत. आणि त्यावर काजोलचा अभिनय. तुम्हाला त्यातलं काजोलचं जरासा झुम लू मै गाणं आठवत असेलच. हे गाणं, आशा भोसले आणि काजोल, शिवाय सोबतीला माधुरी दीक्षित... असा एकत्र सुवर्णयोग नुकताच आला होता.

डान्स दिवाने सिनेमाच्या सेटवर काजोल चक्क अवतरली. तिथे आशा भोसलेही होत्या. आशाताईंनी जरा सा झुम लू मै या ओळी गुणगुणल्या. काजोल तर आनंदानं वेडीच झाली. आणि या सगळ्याला साक्षीदार होती माधुरी दीक्षित. माधुरीनं नुकताच हा व्हिडिओ इन्स्ट्राग्रामवर शेअर केलाय.


She came... she sang... she conquered... and turned us into mushy paps for the legend @asha.bhosle ❤️❤️❤️

Loading...

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

डान्स दिवाने या शोची माधुरी दीक्षित जज आहे. यात काजोल आपल्या हेलिकाॅप्टर ईला सिनेमाचं प्रमोशन करायला आली होती. त्यावेळी आशाताईही आल्या होत्या. मग तिघींनी मिळून कॅमेऱ्याच्या मागे एकच कल्ला केला. काजोलनं आशाताईंना गाण्याची फर्माइश केली. मग आशाताईंना काजोलचा हा आग्रह थोडाच मोडवणार आहे? मग उपस्थितांना मस्त ट्रीट मिळाली.

Aeeeeeeeeeeeeeee! Too kicked ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

A post shared by Kajol Devgan (@kajol) on

काजोल आणि दिग्दर्शक प्रदीप सरकार हेलिकाॅप्टरचं ईलाचं प्रमोशन करायला सेटवर आले होते. या सिनेमात काजोल सिंगल मदरची भूमिका साकारतेय. ती यात गायिकाही आहे. सिनेमा आॅक्टोबरमध्ये रिलीज होतोय.

डान्स हा माधुरीचा अविभाज्य भाग. आता ती कलंक सिनेमातही मुजरा करणार आहे.माधुरीच्या गुरू सरोज खान. त्यांच्याकडूनच माधुरीनं नृत्याचे धडे गिरवले होते. आता पुन्हा एकदा माधुरी आणि सरोज खान आमनेसामने येणार आहेत. बातमी अशी आहे की, कलंक सिनेमात माधुरी दीक्षितचा मुजरा आहे. आणि या मुजरा नृत्यासाठी सरोज खान आणि रेमो दोघं एकत्र येऊन कोरिओग्राफी करणार आहेत.

'तेजाब' सिनेमातील 'एक.. दो.. तीन' , 'बेटा' चित्रपटातील 'धक-धक' व 'खलनायक' सिनेमातील 'चोली के पिछे क्‍या है' यांसारख्या अनेक गाण्यांवरील डान्स माधुरीला सरोज खान यांनी शिकवला आहे. ही जोडी आता चार वर्षांनी पुन्हा एकत्र येणार आहे. सरोज खाननं माधुरीवर केलेली सगळी नृत्य आतापर्यंत हिट झालीयत. त्यामुळे कलंकमधल्या मुजऱ्याकडून अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

VIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यवधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 29, 2018 12:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close