News18 Lokmat

काजोल-शाहरुख पुन्हा एकदा एकत्र, फॅन्सना मिळणार खास ट्रीट

पुन्हा एकदा किंग खान आणि काजोल सिनेमात दिसणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Dec 17, 2018 07:43 PM IST

काजोल-शाहरुख पुन्हा एकदा एकत्र, फॅन्सना मिळणार खास ट्रीट

मुंबई, 17 डिसेंबर : बाॅलिवूडच्या काही जोड्या एव्हरग्रीन आहेत. त्यांना एकत्र पाहायला कोणालाही आवडतं. त्यातलीच एक काजोल आणि शाहरुख खान. त्यांचा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे सिनेमानं तर रेकाॅर्ड ब्रेकच केला.त्यांचा शेवटचा सिनेमा दिलवाले. त्यातलं गेरुआ गाणं लोकप्रिय झालं.

पुन्हा एकदा किंग खान आणि काजोल सिनेमात दिसणार आहेत. सूत्रांच्या बातमीनुसार हिंदी मीडियमच्या सीक्वलमध्ये काजोल आणि शाहरुख दिसणार आहेत. होमी अदजानिया सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.

हिंदी मीडियम सिनेमात इरफान खान होता. तो सिनेमा चांगलाच गाजला होता. आता सीक्वलमध्येही इरफान खान आहे. त्यामुळे या नव्या सिनेमात दमदार कलाकार पाहायला मिळतील. शाहरुख-इरफाननं बिल्लू सिनेमात एकत्र काम केलं होतं.

गेल्या अनेक महिन्यांपासून इरफान अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेत आहे. तिसऱ्या केमोनंतर इरफानच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. सहा केमोथेरपी झाल्यावर पुन्हा एकदा कर्करोगाच्या सर्व चाचण्या करण्यात येतील. नुकत्याच एका मुलाखतीत इरफान म्हणाला की, भविष्याची कोणतीही काळजी न करता आणि कोणत्याही योजना न आखता मुक्तपणे जगण्यास सध्या मी प्राधान्य देत आहे. माझ्या या आजारामुळे मृत्यू मला कधीही कवटाळू शकतो असंही त्याने यावेळी म्हटलं होतं.

इरफान खान सांगतो, मी अनेक स्वप्नं आणि इच्छा आणि महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून एका भरधाव ट्रेनने जात होतो आणि अचानक टीसी येऊन म्हणाला तुमचा स्टाॅप आलाय. आता तुम्हाला उतरावं लागेल. इरफाननं त्यावेळी लिहिलेल्या पत्रानं सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला होता.

Loading...

सध्या अनेक जणांना कर्करोगासारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे. बॉलिवूडचे मनिषा कोइराला, अनूराग बसू यांसारख्या कलाकारांनी कर्करोगावर मात करून आयुष्याची सेकेंड इनिंग सुरू केली आहे. त्याचप्रमाणे इरफानने देखील त्याच्या आजारावर मात करून आता त्याच्या आयुष्यातील सेकेंड इनिंगची सुरुवात करणार आहे. त्याचा सहावा किमो यशस्वी पार पडल्यानंतर त्याने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आहे आणि एक चित्रपट स्वीकारला आहे. लंडनमधून भारतात परतल्यावर इरफान सगळ्यात आधी हिंदी मीडियम या सिनेमाच्या सिक्वलमध्ये काम करणार असल्याचं इरफानने स्पष्ट केलंय. इरफानच्या या निर्णयामुळे त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


स्टार स्क्रीन अॅवाॅर्डला बाॅलिवूड स्टार्सचा जलवा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 17, 2018 07:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...