कपिल शर्मा शोवर पहिल्यांदा एकत्र येणार काजोल- करण, सेटवरचे फोटो लीक

कपिल शर्मा शोवर पहिल्यांदा एकत्र येणार काजोल- करण, सेटवरचे फोटो लीक

कपिलच्या शोमध्ये काजोल आणि करणने तुफान मस्ती केली असेल हे पाहून कळतंच. यावेळी काजोलने गुलाबी रंगाचा पँटसूट घातला होता तर करणने काळ्या रंगाचं जॅकेट घातलं होतं.

  • Share this:

मुंबई, २१ एप्रिल- सोनी वाहिनीवरच्या द कपिल शर्मा शोमध्ये लवकरच दोन खास पाहुणे येणार आहेत. हे दोन पाहुणे बॉलिवूडचे बेस्ट फ्रेंड काजोल आणि करण जोहर आहेत. काही दिवसांपूर्वी दोघं कपिलच्या शोमध्ये येतील अशी चर्चा होती. पण याचा पुरावा आता खुद्द काजोलनेच दिला. तिने इन्स्टाग्रामवर कपिलच्या सेटवरचा फोटो शेअर केला.


मीडिया रिपोर्टनुसार, कपिल काजोल आणि करणला एकत्र शोमध्ये आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत होता. मात्र काजोल मुलीला भेटायला सिंगापुरला गेल्यामुळे योग्य अशी डेट मिळत नव्हती. काजोलची मुलगी न्यासा सध्या सिंगापुरमध्ये शिक्षण घेत आहे. त्यामुळे काजोल सतत मुंबई- सिंगापुर दौरा करत असते.


काजोलला करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये पाहण्यात आलं होतं. यावेळी काजोल पती अजय देवगणसोबत आली होती. पण करण आणि काजोल दोघं कोणत्या शोमध्ये मुलाखतीला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. नुकतीच त्या दोघांची द कपिल शर्मा शोवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.


कपिलच्या शोमध्ये काजोल आणि करणने तुफान मस्ती केली असेल हे पाहून कळतंच. यावेळी काजोलने गुलाबी रंगाचा पँटसूट घातला होता तर करणने काळ्या रंगाचं जॅकेट घातलं होतं.


कपिलच्या या शोमध्ये २० एप्रिलला शनिवारी बॉलिवूडचे तीन नावाजलेले खलनायक रंजीत, गुलशन ग्रोवर आणि किरण कुमार आले होते. तिघांनीही आपल्या फिल्मी करिअरबद्दल आणि खासगी आयुष्याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 03:23 PM IST

ताज्या बातम्या