अजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल

अजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल

रुक रुक रुक अरे बाबा रुक गाणं नक्कीच आठवत असेल. आता याच गाण्यावर थिरकायला काजोल सज्ज झालीय.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : बाॅलिवूडमध्ये अशा काही जोड्या आहेत, त्या एकत्र समोर कमी वेळा येतात. पण त्यांचं एकमेकांवरचं प्रेम सारखं व्यक्त करत असतात. त्यापैकी एक म्हणजे अजय देवगण आणि काजोल.

आता काजोल तिच्या सिनेमात अजय देवगणच्या गाण्यावरच थिरकताना दिसणार आहे. तुम्हाला अजय देवगणचा तब्बूसोबतचा विजयपथ आठवत असेल आणि त्यातलं रुक रुक रुक अरे बाबा रुक गाणं नक्कीच आठवत असेल. आता याच गाण्यावर थिरकायला काजोल सज्ज झालीय.

काजोलचा आगामी चित्रपट 'हेलिकॉप्टर ईला' 12 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची निर्मिती अजय देवगणने केली आहे. या चित्रपटात काजोल सिंगल मदरच्या भूमिकेत दिसणार आहे. जी आपल्या मुलाबाबत खूप सेन्सिटिव्ह असते. या चित्रपटातील  रिलीज झालेली गाणी चांगलीच चर्चेत आहेत. या चित्रपटातील आणखीन एक गाणे अद्याप प्रदर्शित झालेले नाही. या गाण्याची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहत आहेत.

1994 साली प्रदर्शित झालेला चित्रपट विजयपथमधील रुक रुक रुक अरे बाबा रुक हे गाणे नव्याने पाहायला मिळणार आहे. या गाण्यावर काजोल परफॉर्म करताना दिसणार आहे. या गाण्याला संगीत राघव सच्चर यांनी दिले आहे व पालोमी घोषने स्वरसाज दिला आहे. हे गाणे 25 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

'हेलिकॉप्टर ईला' चित्रपटात काजोलने ईलाची भूमिका साकारली आहे. तिला गाणे गाण्याची आवड असते. मात्र मुलाच्या जबाबदाऱ्यांमुळे ती आपल्या आवडीकडे दुर्लक्ष करते. तिला आपल्या मुलाचे संगोपन खूप चांगले करायचे असते. त्यामुळे नेहमी त्याच्यासोबत राहून ती त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत असते, असे या सिनेमात दाखवण्यात आले आहे.

First published: September 24, 2018, 10:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading