दोन वेळा सीरिअस रिलेशनशिपमध्ये होती ही अभिनेत्री, ब्रेकअपनंतर ढसाढसा रडली

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काजल अग्रवालने तिच्या लव्ह लाइफ बाबतचे काही खुलासे केले.

News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2019 09:29 AM IST

दोन वेळा सीरिअस रिलेशनशिपमध्ये होती ही अभिनेत्री, ब्रेकअपनंतर ढसाढसा रडली

मुंबई, 19 जून : साउथ आणि बॉलिवूडमध्ये स्वतःचा वेगळा चाहता वर्ग निर्माण करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल आज तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. कोणत्याही विषयावर आपलं मत बिनधास्तपणे मांडणाऱ्या काही मोजक्या अभिनेत्रींमध्ये काजलचा समावेश होतो. काही दिवसांपूर्वी आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आलेली काजल अग्रवाल आता मात्र तिनं नुकत्याच दिलेल्या एक मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत काजलनं तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधीत अनेक खुलासे केले. ज्यात तिच्या रिलेशनशिप स्टेटसविषयीचा खुलासा देखील तिनं केला आहे.

 

View this post on Instagram

 

@josephradhik @vipulbhagatmakeupandhair 💕 in @papadontpreachbyshubhika styled by @nkdivya

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काजल अग्रवालने तिच्या लव्ह लाइफ बाबतचे काही खुलासे केले. ती म्हणाली, ‘माझ्या जीवनात मी दोन व्यक्तींवर खरं प्रेम केलं पण ते फार काळ टिकू शकलं नाही. मी पहिल्यांदा ज्या व्यक्तीवर प्रेम केलं ते सिने इंडस्ट्रीमध्ये येण्याआधीच संपलं होतं. पण त्यानंतर मी पुन्हा एकदा प्रेमात पडले पण कोणतंही नातं टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही त्या व्यक्तीला वेळ देणं आवश्यक असतं. मात्र सध्याच्या परिस्थित माझ्याकडे वेळ नाही त्यामुळे माझं दुसरं नातंही टिकू शकलं नाही. दुसऱ्या वेळी ब्रेकअप झालं, तो माझ्या लाइफमधला खूप वाईट काळ होता. मी त्या वेळी ढसाढसा रडले. पण त्याचवेळी ठरवलं की मी पुन्हा या कारणासाठी कधीच रडणार नाही.’

काजलनं तिच्या लव्ह लाइफ बद्दल या मुलाखतीत सांगितलं असलं तरीही तिनं त्या दोन्ही व्यक्तींची नाव घेणं टाळलं. काही वर्षांपूर्वी काजल अग्रवाल आणि बाहुबली अभिनेता प्रबास रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या मात्र नंतर या दोघांमध्ये बिनसलं आणि ते वेगळे झाले. त्यामुळे आता काजलनं सांगितलेली दुसरी व्यक्ती प्रभास तर नाही ना अशी चर्चा सध्या सुरू आहे. काही दिवसांपूर्वी काजलनं नो मेकअप लुक शेअर केल्यानं तिची सोशल मीडियावर खूप चर्चेत होती. तिच्या या लुकचं चाहत्यांकडून खूप कौतुकही झालं. सिंघम सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी काजल आज फक्त साऊथच नाही तर बॉलिवूडमधीलही आघाडीची अभिनेत्री आहे.

 

View this post on Instagram

 

People can’t discover themselves anymore. Perhaps because we live in a world crazed by physical attraction or because social media has swallowed up our self esteem in whom and what it glorifies. Billions of rupees are spent on cosmetics and beauty products that promise you the prefect body. Narcissism seems to exist everywhere. Between those lines, we try to join the crowd or feel left out. Yet the only way we can truly be happy is when we start accepting who we are rather than defining or carving a different image for ourselves. Although makeup beautifies our outer persona, does it build our character and define who we are? True beauty lies, in accepting ourselves for how lovely we are.

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2019 09:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close