मुंबई, 29 ऑक्टोबर: 2020 मध्ये अनेक सेलिब्रिटींच्या घरी पाळणा हलला. तर काहींनी लग्न उरकून घेतली. साऊथ पासून बी टाऊनपर्यंत नाव गाजवणारी अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Agrawal)ही लवकरच बोहल्यावर चढणार आहे. गौतम किचलू (Gautam Kitchlu)सोबत काजल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.काजलचं लग्न शुक्रवारी 30 ऑक्टोबरला होणार आहे. तिच्या मेहंदी आणि हळदीचा समारंभ गुरुवारी पार पडला.
काजलच्या मेहंदी आणि हळदीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मेहंदीसाठी काजलने पिवळ्या रंगाचा छानसा ड्रेस घातला होता. या सध्या लूकमध्येही ती अत्यंत सुंदर दिसत होती. काजलची मेहंदीही दणक्यात पार पडली.
मेहंदीसाठी तिने पेस्टल ग्रीन कलरचा प्रिंटेड शरारा घातला होता. फॅशन डिझायर अनिताने तिचा हा शरारा डिझाईन केला होता. अभिनेत्रीच्या मेहंदी आणि हळदीच्या समारंभासाठी तिचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होता.
View this post on Instagram
काजलने 'क्यों हो गया ना' या सिनेमातून 2004 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ऐश्वर्या राय-बच्चन आणि विवेक ऑबेरॉय स्टारर या सिनेमात तिने ऐश्वर्याच्या बहिणीची भूमिका केली होती. काजलने अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. अजय देवगणसोबत सिंघम या चित्रपटामध्येही काजल झळकली होती. त्यानंतर अक्षय कुमारसोबत स्पेशल 26 सिनेमातही तिने काम केलं होतं.