देवरिया येथील शो रद्द करून शहिदाच्या कुटुंबाला भेटायला गेला कैलाश खेर, अशी केली मदत

कुटुंबाला धीराचे शब्द देत विजयलक्ष्मी यांना कठीण काळात हिंमत्तीने प्रसंगाला सामोरं जाण्याचा सल्ला दिला.

News18 Lokmat | Updated On: Feb 18, 2019 05:51 PM IST

देवरिया येथील शो रद्द करून शहिदाच्या कुटुंबाला भेटायला गेला कैलाश खेर, अशी केली मदत

देवरिया, उत्तर प्रदेश, १८ फेब्रुवारी २०१९- प्रसिद्ध बॉलिवूड गायक कैलाश खेर शनिवारी देवरिया महोत्सवात सहभागी होणार होता. मात्र, पिलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर त्याने आपला शो रद्द केला आणि हल्ल्यात शहीद झालेला जवान विजय कुमार यांच्या कुटुंबाला भेटायला गेला. विजय हे उत्तर प्रदेश मधील देवरिया जिल्ह्यातील छपिया गावचा राहणारे होते. कैलाश खेरने रविवारी दुपारी विजय यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि आर्थिक मदत केली. कैलाश खेरने शहीद विजय यांच्या पत्नी विजयलक्ष्मी आणि वडील रामायण मौर्या यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा चेक दिला. कुटुंबाला धीराचे शब्द देत विजयलक्ष्मी यांना कठीण काळात हिंमत्तीने प्रसंगाला सामोरं जाण्याचा सल्ला दिला. कैलाशने जवळपास २० मिनिटं कुटुंबीयांसोबत वेळ घालवला.


पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशात शोकाकुल वातावरण आहे. एकीकडे भारतीय नागरिक शहिदांसाठी दुःख व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा सरकारने द्यावी अशी मागणीही ते करत आहेत. हाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धमकीनंतर टी-सीरिजने त्यांच्या यूट्युब चॅनलवरून राहत फतेह अली खान आणि आतिफ असलम यांची सर्व गाणी काढून टाकली. याबद्दल अधिक बोलताना एमएनएस चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले की, ‘आम्ही टी-सीरिज, सोनी म्युझिक, व्हिनस, टीप्ससारख्या कंपन्यांसोबत चर्चा केली आणि त्यांना पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्यास सांगितलं. कंपन्यांनी लगेच यावर कृती केली तर ठीक अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने पावलं उचलावी लागतील.’Loading...


 

View this post on Instagram
 

Yesterday as I was cancelling the show at Deoria Mahotsav, the 30 thousand plus people that had come from all nearby village and tahsil in Deoria, Stood by as we all took our hearts out in prayers for our Brave Departed Martyrs. हर विपदा की घड़ी में सारा भारत एक होता है। धन्य है ये धरती। . . . . . #deoriamahotsav #homagetomartyrs #ekbharat #shreshthbharat .


A post shared by Kailash Kher (@kailashkher) on

दरम्यान, जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात ४० भारतीय सीआरपीएफच्या जवानांना वीरमरण आलं. या दहशतवादी हल्ल्यामुळे सर्वसामान्य नागरिकापासून ते बॉलिवूड सेलिब्रिटीपर्यंत सर्वांमध्येच पाकिस्तानविरुद्ध चीड निर्माण झाली आहे. या सगळ्यात अजय देवगणने एक मोठा निर्णय घेतला. अजयने ट्विट करत त्याचा आगामी 'टोटल धमाल' हा सिनेमा पाकिस्तानमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय त्याने घेतला असल्याचे स्पष्ट केले. अजयने ट्विटमध्ये लिहिले की, ‘पुलवामा हल्ल्यानंतर सध्याचं वातावरण पाहता टोटल धमालच्या टीमने हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.’

Pulwama Encounter: भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना घेरले, ग्राऊंडवरून पहिला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 05:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...