S M L

ब्रिटिश पॉप स्टारने गायलेलं 'अल्लाह के बंदे' हे गाणं ऐकून तुम्हाला रडू कोसळेल!

असं म्हणतात की संगीताला कोणतीच भाषा नसते. सुरांची कोणतीच सीमा नसते. पण कधी कधी लोक एखाद्या सुंदर गाण्यावर आपल्या आवाजात प्रयोग करतात आणि...

Renuka Dhaybar | Updated On: Mar 4, 2018 08:04 PM IST

ब्रिटिश पॉप स्टारने गायलेलं 'अल्लाह के बंदे' हे गाणं ऐकून तुम्हाला रडू कोसळेल!

04 मार्च : असं म्हणतात की संगीताला कोणतीच भाषा नसते. सुरांची कोणतीच सीमा नसते. पण कधी कधी लोक एखाद्या सुंदर गाण्यावर आपल्या आवाजात प्रयोग करतात आणि गाण्याचे सगळे सुरच हादरवून टाकतात असं म्हणायला हरकत नाही. असाच एक प्रयत्न जगातल्या सुप्रसिद्ध तरूण गायक जायन मलिक याने केला आहे.

जायनने सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचं 'तेरी दिवानी' आणि 'अल्लाह के बंदे' हे गाणं गाण्याचा प्रयोग केला आहे. जायनने ही गाणी आपल्या स्टाईलमध्ये गाण्याचा प्रयत्न केला खरा परंतू त्यांने त्याच्या स्टाईलमध्ये गाऊन या सुमधूर सुफी गाण्याची वाट लावली.

आता जायनने गायलेलं गाणं ऐकून तुम्ही काही म्हणण्याआधी जाणून घ्या की सोशल मीडियावर जायन मलिकसाठी तरूणाई वेडीपिशी आहे. 25 वर्षाच्या जायनचे सोशल मीडियावर 2.7 करोड इतके फॉलोअर्स आहेत.आता या सगळ्यावर कैलाश खेर यांना विचारलं असता, मला या कलाकाराबद्दल माहित नाही असं ते म्हणाले. पण माझ्या गाण्याची ओळख परदेशातही आहे याचा मला आनंद असल्याचंही त्यांनी सांगितलं. जायनला गाणं गायचंच असेल तर मी त्याला शिकवायला तयार असल्याचंही कैलाश खेर यांनी सांगितलं.

 

Loading...

Morning vibes 🌴

A post shared by Zayn Malik (@zayn) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 4, 2018 07:17 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close