मुंबई, 24 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death) अनेक जणांनी मेंटल हेल्थ (Mental Health), नैराश्य (Depression), आत्महत्या (Suicide) यांसारख्या विषयांवर त्यांची मतं मांडली आहेत. काही कलाकारांनी देखील त्यांनी या घटनांचा सामना कसा केला हे शेअर केलं होते. सलमान खान (Salman Khan) बरोबर 'सुल्तान'मध्ये स्क्रीन शेअर करणारा तसंच 'काय पो छे', 'गोल्ड' आणि 'शकुंतला देवी'मध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा कलाकार अमित साध (Amit Sadh)याने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याने वयाच्या 16 ते 18 वर्षांच्या काळात एकदा नव्हे तर तब्बल 4 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अचंबित करणारी बाब म्हणजे यामागे कोणतेही कारण नव्हते.
बॉलिवूड अभिनेता अमित साधने एका मुलाखतीदरम्यान माहिती दिली की, '16 ते 18 वर्षांचा असताना मी 4 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मनात आत्महत्येचे विचार नव्हते, पण केवळ मला आत्महत्या करायची होती.' अमितने पुढे असं म्हटलं की यासाठी त्याने काही प्लॅनिंग केलं नव्हतं. तो म्हणाला की, 'एक दिवस मी झोपून उठलो आणि वारंवार आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला. देवाच्या कृपेने मला चौथ्या वेळी लक्षात आलं की का काही मार्ग नाही आहे. त्यानंतर गोष्टी बदलल्या आणि मी कधीही न हरण्याचा निर्णय घेतला.'
(हे वाचा-‘त्या आजारामुळे जीवही गेला असता’ बाहुबलीच्या भल्लालदेवने सांगितला अनुभव)
या संभाषणादरम्यान त्याने असे सांगितले की एका मोठ्या अभिनेत्याने त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडला असे म्हटले होते की अमित वेडा आहे त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जा. यावर अमित म्हणाला की, 'मी तेव्हा काही उत्तर दिलं नव्हतं पण दोन वर्षांनी त्या कलाकाराला मी भेटलो तेव्हा त्यांना सांगितलं की सर मी वेडा नाही आहे. मी जास्त भावनिक किंवा माझे काही इश्यू आहेत असं असू शकेल. मला एकटेपणा वाटतो किंवा मी त्रस्त असतो पण मी वेडा नाही आहे.'
View this post on Instagram
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अमित शेवटचे 'शकुंतला देवी' सिनेमात दिसला होता. यामध्ये त्याने अभिनेत्री विद्या बालन आणि सान्या मल्होत्रा यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. त्याचप्रमाणे वेब सीरिज 'ब्रीद'मध्ये देखील कमालीचा अभिनय करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे.