'सिंघम'फेम काजलच्या किसचा Video झाला व्हायरल

'सिंघम'फेम काजलच्या किसचा Video झाला व्हायरल

तुम्हाला सिंघम सिनेमातली अभिनेत्री काजल अग्रवाल अभिनेत्री आठवतेय ना? तिचा तेलगू सिनेमा डिसेंबरमध्ये रिलीज होतोय. त्याचा टिझर लाँच नुकताच झाला.

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर : तुम्हाला सिंघम सिनेमातली अभिनेत्री काजल अग्रवाल अभिनेत्री आठवतेय ना? तिचा तेलगू सिनेमा डिसेंबरमध्ये रिलीज होतोय. त्याचा टिझर लाँच नुकताच झाला. यावेळी सिनेमातले सगळे कलाकार उपस्थित होते. आणि एक घटना घडली. त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय

कार्यक्रमाच्या वेळी सिनेमाचा सिनेमॅटोग्राफर छोटा नायडू याची ओळख करून देताना अचानक त्यानं काजलचा किस घेतला. क्षणभर काजल गोंधळली. पण समयसूचकता दाखवून ती म्हणाली, तुम्ही तर चान्स मारला. त्यावर नायडू म्हणाले, तू  मेहरीनला किस केलास, मग मी का नाही करावा? यावर पुन्हा काजलनं छोटा नायडू कुटुंबातलेच आहेत, असं म्हणून सावरून घेतलं.

View this post on Instagram

@kajalaggarwal.offl ♥️

A post shared by KAJAL AGGARWAL ♥️ (@kajalaggarwal.offl) on

सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतोय. छोटा नायडूनं जबरदस्तीनं किस केला. त्यामुळे हे प्रकरण #MeeToo असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

सिंघम सिनेमानंतर सिंघम रिटर्न सिनेमा आला. अजय देवगणच्या 'सिंघम रिटर्न्स'नी सलमान खानला चांगलीच 'किक' दिली असून पहिल्याच दिवशी सिंघम रिटर्न्सनी तब्बल 32.09 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांच्या यादीत सिंघम रिटर्न्स तिसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. सलमानच्या 'किक' चित्रपटानं पहिल्या दिवशी 24.40 कोटी रुपयांची कमाई केली होती.

Photos : दीपिकाच्या हातावर लागली रणवीरच्या नावाची मेहंदी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2018 02:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading