मुंबई, 30 मार्च : 'दरिया दिल' सिनेमातील 'धनीराम', 'हम हैं कमाल'मधील 'पितांबर', 'आंखे' सिनेमातील 'हसमुख राय' तर 'दुल्हे राजा'मधील 'केके सिंघानिया'. या आणि अशा 300 हून अधिक सिनेमात सातत्यानं समोर आलेले प्रसिद्ध अभिनेते म्हणजे कादर खान. असं म्हणतात की, माणसात क्षणता असेल तर तो त्याला संधी मिळणं गरजेचं असतं. मग तो त्याच्यातील कला दाखवतो आणि दुनियेला वाह वाह म्हणायला भाग पाडतो. बॉलिवूडमध्ये नाव कमावणाऱ्या कादर खान यांचं आयुष्यही असचं होतं. पण बॉलिवूड अभिनेता होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास काही सोपा नव्हता. काद खान यांचं आयुष्यही एका सिनेमासारखंच अनेक चढ उतारांनी भरलं होतं.‘जिंदगी तो खुदा की रहमत है, जो नहीं समझा उसकी जिंदगी पर लानत है'. हा त्यांनी लिहिलेला डायलॉग त्यांच्या आयुष्यावर देखील चपखल बसतो. आज कादर खान यांच्या आयुष्याच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया.
कादर खान यांचे वडील अब्दुल रहमान अफगाणीस्तानी होते तर आई मां इकबाल बेगम ब्रिटिश इंडियाची होती. त्यांना मोठा भाऊ होता पण त्याचा फार लवकर मृत्यू झाला. कादर यांच्या जन्मानंतर त्यांची आई फार घाबरली होती. तीन मुलांप्रमाणेच कादरचाही मृत्यू होईल अशी भिती त्यांना होती. त्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब अफगाणिस्तान सोडून भारतात आलं आणि मुंबईतील एक वस्तीत स्थानिक झालं.
हेही वाचा - दीवारच्या शुटींगचा पहिला दिवस, बिग बींनी जबरदस्तीनं घातला नॉटेड शर्ट अन् रातोरात बनली फॅशन;आहे मजेदार किस्सा
कादर यांच्या आई वडिलांमध्ये अचानक भांडणं वाढली. दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर कादर आईबरोबर तिच्या माहेरी राहत होते. पण काही दिवसातच त्यांच्या आईचं जबरदस्ती लग्न लावण्यात आलं. त्या काळात एकट्या बाईनं मुलाला सांभाळणं आणि जगणं फार कठीण होतं. आईच्या दुसऱ्या लग्नानंतर कादर खान यांना सावत्र वडील मिळाले पण त्यांचं प्रेम कधीच मिळू शकलं नाही. त्यांच्या गरीबीत आणखी वाढ झाली. त्यांच्या दोन वेळेच्या जेवणारे हाल होते. तर पैसे कमावण्याचं कोणतंही साधन नव्हतं.
मीडिया रिपोर्टनुसार, पैशांसाठी कादर खानच्या सावत्र वडिलांनी त्यांना 10 किलोमीटर दूर पहिल्या वडिलांकडून 2 रुपये आणण्यासाठी पाठवलं होतं. कादर यांना घेऊन ते मस्जिदच्या बाहेर भिक मागायला बसायचे. इतकं करूनही त्यांच्या रोजच्या जेवणाची भ्रांत होती. कादर खान आणि त्यांच्या कुटुंबाला आठवड्याचे 3 दिवस उपाशी झोपावं लागत होतं.
हेही वाचा - 1-2 नाही 25 सिनेमात अमिताभ बच्चनचं नाव सेम टू सेम; तुम्हाला नाव माहिती आहे का?
कादर खान यांना गरीबीनं हैराण केलं होतं. कादर यांनी खूप शिकावं अशी त्यांच्या आईची इच्छा होती पण परिस्थितीमुळे त्यांना शिकता आलं नाही. त्यांनी फार लहान वयात शाळा सोडली आणि स्थानिक मिलमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यांच्या आईनं त्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. पुढे कादर खान यांनी मुंबई विश्वविद्यालयातून संबद्ध इस्माइल युसूफ कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. त्यांनी पुढे जाऊन सिविल इंजीनिअरिंगही केलं.
अभिनेता मस्जिदजवळ असलेल्या कब्रस्तानात जाऊन कादर खान लपायचे आणि दोन कब्रींच्या मध्ये बसून मोठमोठ्यानं फिल्मी डायलॉग बोलायचे. तिथे दररोज एका भिंतीच्या मागून एक व्यक्ती कादर खान यांना पाहायचे. ती व्यक्ती होती अशरफ खान. त्यावेळी ते स्टेड ड्रामा शोसाठी 8 वर्षांच्या मुलाला शोधत होते. त्यांनी कादर खानला पाहिलं आणि नाटकाच काम दिलं. त्यानंतर कादर खान यांचं नशीब बदललं. शिक्षण घेत त्यांनी नाटकांत काम करण्यास सुरूवात केली.
कॉलेजमध्ये असताना कादर खान यांचं 'ताश के पत्ते' हे नाटक खूप प्रसिद्ध झालं होतं. त्यांना एकेदिवशी दिलीप कुमार यांचा फोन आला. ते म्हणाले, 'मी दिलीप कुमार बोलतोय. ताश के पत्ते हे नाटक मला बघायचं आहे'. दिलीप कुमार यांचा आवाज ऐकून कादर खान सुन्न झाले. त्यांनी काही वेळानं त्यांना रिल्पाय दिला आणि 2 अटी ठेवल्या. ते म्हणाले, 'तुम्ही खुशाल येऊ शकता नाटक पाहायला पण माझ्या अटी आहेत. तुम्ही नाटक पाहायला वेळेवर या. कारण कॉलेजचा गेट एकदा बंद केल्यानंतर पुन्हा उघडला जात नाही. आणि दुसरी अट म्हणजे, पुन्हा बसून संपूर्ण नाटक पाहावं लागेल'. दिलीप कुमार यांनी कादर यांच्या अटी मान्य केल्या आणि ते नाटक पाहायला गेले.
दिलीप कुमार यांनी कादर खान यांचं काम खूप आवडलं होतं. त्यांनी नाटक संपल्यानंतर लगचेच तु माझ्या सिनेमात काम करं असं सांगितलं. दिलीप कुमार यांनी कादर खान यांना 2 सिनेमात साइन केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News