Kader Khan: मुंबईतील साबू सिद्दीकी कॉलेजमधील शिक्षक ते बॉलिवूडचा व्हिलन असा होता कादर खान यांचा प्रवास

कादर खान यांना प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर हा आजार होता.

News18 Lokmat | Updated On: Jan 1, 2019 11:42 AM IST

Kader Khan: मुंबईतील साबू सिद्दीकी कॉलेजमधील शिक्षक ते बॉलिवूडचा व्हिलन असा होता कादर खान यांचा प्रवास

मुंबई, १ जानेवारी २०१९- ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी कॅनडातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. ते व्हेंटिलेटरवर होते. अखेर त्यांनी आज जगाचा निरोप घेतला. कादर खान यांना प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर हा आजार होता. २०१५ मध्ये आलेला 'दिमाग का दही' हा कादर खान यांचा अखेरचा सिनेमा ठरला. अनेक वर्ष ते कॅनडाला आपला मुलगा आणि सून यांच्या सोबत राहात होते.

१९३७ मध्ये अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये जन्मलेल्या कादर खान यांनी ३०० सिनेमांपेक्षा जास्त सिनेमात काम केलं आहे. ते लेखक म्हणून सर्वांचे जेवढे चाहते होते तेवढंच त्यांना लोकांनी एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून प्रेम दिलं.

कादर खान यांनी सिनेकरिअरमध्ये नानाप्रकारच्या भूमिका करत लोकांच्या मनावर अधिराज्य केलं. त्यांना नकारात्मक आणि विनोदी अशा दोन्ही भूमिकांमध्ये लोकांनी स्वीकारलं. गेल्या काही वर्षांपासून प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी सिनेसृष्टीपासून स्वतःला दूर ठेवले होते.


नवीन वर्षाची दुख:द सुरूवात, ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन


कादर खान यांच्या अभिनयावर ट्रॅजेडी किंग फार खूश झाले होते. कॉलेजमध्ये जेव्हा कादर खान एका गॅदरिंगमध्ये परफॉर्म करत होते तेव्हा त्यांचा परफॉर्मन्स पाहून दिलीप कुमार खूश झाला. दिलीप कुमारांनी त्यांच्या पुढच्या सिनेमात कादर खान यांना साइन करुन घेतले. यानंतर खान यांचं पूर्ण कुटुंब मायानगरी मुंबईत आलं.


अफगाणिस्तानात जन्मलेल्या कादर खान यांचा असा होता संघर्षमय प्रवास

कादर खान यांचं शिक्षण

कादर यांनी इस्माइल यूसुफ कॉलेजमधऊन इंजीनिअरिंग केले. त्यानंतर एमएच साबू सिद्दीकी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगमध्ये सिव्हिल इंजीनिअरिंगसाठी ते प्राध्यापक होते. कादर खान यांना उर्दू शायरी वाचायला आणि लिहायला फार आवडायचं. कादर खान यांच्या पश्चात दोन मुलं आहे आणि त्यांचा परिवार आहे.

९० च्या शतकात गोविंदा आणि कादर खान अशी जोडी हिट होती. 'दूल्हे राजा', 'कुली न 1', 'राजा बाबू' आणि 'आँखे' असे सिनेमे एव्हरग्रीन ठरले. याशिवाय त्यांनी 'कुली'मध्ये अमिताभ बच्चनसोबतही काम केलं होतं. तर 'हिम्मतवाला' सिनेमात जितेंद्र यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारली होती.


VIDEO: अमितच्या लग्नाची पत्रिका घेऊन राज ठाकरे सिद्धीविनायकाच्या चरणी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 1, 2019 11:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close