Kabir Singh Teaser: बाहुबली फेम प्रभासनं केलं शाहिद कपूरच्या लूकचं कौतुक, म्हणाला...

Kabir Singh Teaser: बाहुबली फेम प्रभासनं केलं शाहिद कपूरच्या लूकचं कौतुक, म्हणाला...

श्रद्धा कपूरनं शाहीदचं कौतुक केल्यानंतर आता या टीझरवर बाहुबली फेम प्रभासनं देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : शाहिद कपूरचा सिनेमा ‘कबीर सिंह’चा टीझर नुकताच रिलीज झाला. प्रेक्षकांकडून या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून बॉलिवूडमध्ये या सिनेमातील शाहिदच्या लूकची चर्चा आहे. काही लोक याला ‘अर्जुन रेड्डी’च्या टीझरशी तुलना करत आहेत तर काही जण या टीझरला साउथ टीझरची कॉपी देखील म्हणत आहेत. मात्र शाहिदच्या या सिनेमातील लूकचं कौतुक फक्त बॉलिवूडकरांनाच नाही तर साउथ सुपरस्टार्सनासुद्धा आहे. सर्वात आधी अभिनेत्री श्रद्धा कपूरनं शाहीदचं कौतुक केल्यानंतर आता या टीझरवर बाहुबली फेम प्रभासनं देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

DNAच्या रिपोर्टनुसार श्रद्धा कपूरनंतर साउथ अभिनेता प्रभासनं कॉल करुन शाहिद कपूरचं अभिनंदन केलं. प्रभासनं जवळापास 7 मिनिटं शाहिदशी गप्पा मारल्या. त्याचं झालं असं की, ज्यावेळी प्रभास जेव्हा ‘कबीर सिंह’चा टीझर पाहत होता त्यावेळी त्याचा हेअरस्टायलिस्ट अलीम हकिम त्याठिकाणी होता. त्यानंच शाहिदला कॉल करून त्याचं अभिनंदन करावं असं प्रभासला सुचवलं होतं.

अलीम प्रभासच्या प्रतिक्रियेबाबत बोलताना म्हणाला, मी शाहिदला कॉल करून फोन प्रभासच्या हातात दिला. प्रभासनं शाहिदच्या अभिनयाचं आणि लूकचं कौतुक केलं आणि म्हणाला कबीर सिंहचा लूक ओरिजनल साउथ सिनेमापेक्षाही चांगला आहे. त्यानंतर त्या दोघांनी काहीवेळ गप्पा मारल्या असंही अलीमनं सांगितलं.

कबीर सिंह हा सिनेमा 2017मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगु सिनेमा ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक आहे. तेलुगु सिनेमात अभिनेता विजय देवेराकोंडा आणि अभिनेत्री शालिनी पांडे मुख्य भूमिकेत दिसले होते. हिंदी रिमेक कबार सिंह येत्या 21 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या सिनेमात शाहिद कपूर सोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 04:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading