मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कबीर बेदीनीं शूटिंगसाठी गाठला लांबचा पल्ला; शेअर केला 'द जंगीपूर ट्रायल' चा थरारक प्रवास

कबीर बेदीनीं शूटिंगसाठी गाठला लांबचा पल्ला; शेअर केला 'द जंगीपूर ट्रायल' चा थरारक प्रवास

७०-८० च्या दशकातील बॉलिवूड अभिनेता कबीर बेदी यांना त्याकाळातील हॅंडसम हंकम्हणून ओळखलं जातं. कबीर बेदी वयाच्या ७५ व्या वर्षीही पडद्यावर चमकत आहेत. वेब सिरीज असो की चित्रपट, कबीर बेदींची उपस्थिती स्वतःमध्ये खास आहे. आणि त्यांच्या चाहत्यांच्या शुभेच्छाही नेहमीच त्यांच्यासोबत आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 27 नोव्हेंबर-  ७०-८० च्या दशकातील बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता कबीर बेदी  (Kabir Bedi)  यांना त्याकाळातील हॅंडसम हंकम्हणून ओळखलं जातं. कबीर बेदी वयाच्या ७५ व्या वर्षीही पडद्यावर चमकत आहेत. वेब सिरीज असो की चित्रपट, कबीर बेदींची उपस्थिती स्वतःमध्ये खास आहे. आणि त्यांच्या चाहत्यांच्या शुभेच्छाही नेहमीच त्यांच्यासोबत आहेत.

बॉलीवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये आपली क्षमता सिद्ध करणाऱ्या कबीर बेदी यांना कोणत्याही भूमिकेसाठी तयार करणे सोपे काम नाही. पण अलीकडे, फोनवर एका चित्रपटाचे वर्णन ऐकल्यानंतर, कबीर बेदी यांनी लगेच होकार दिला. जरी त्यांना त्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तासंतास प्रवास करावा लागला तरी ते आनंदी आहेत.

'द जंगीपूर ट्रायल'  (The Jangipur Trial)   चित्रपटाचे दिग्दर्शक देबादित्य बंदोपाध्याय आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर अमित बहल यांनी कबीर बेदींना फोनवर कथा सांगितली तेव्हा त्यांना चित्रपटाचं कथानक खूप आवडलं आणि त्यांनी लगेच होकार दिला.आणि शूटिंगसाठी पहिली फ्लाइट घेऊन ते जॉय सिटी म्हणजेच कोलकाता येथे पोहोचले. तेथून ते दररोज जंगीपूर, मुर्शिदाबाद, मोरेगाव, अझीमगंज आणि बेहरामपूर सारख्या ठिकाणी 8 तासात पोहचत असे. पहिल्या दिवसाप्रमाणेच ते रोज सेटवर उत्साहात यायचे. सेटवरील बाकीच्या स्टारकास्टने त्याचं मोकळ्या मानने स्वागत केलं. कबीर बेदी म्हणतात की, "मला चित्रपटाची कथा, कथानक आणि स्टारकास्ट खूप आवडली. यात अनेक चांगले कलाकार आहेत जे त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातील."

(हे वाचा:Deepika Padukone ने खास कारणासाठी 'तमाशा'मध्ये घातलं होतं लाल स्वेटर... )

वयाच्या 75 व्या वर्षी 150 चित्रपट करून भारतीय, अमेरिकन आणि इटालियन चित्रपटांमध्ये झंझावाती खेळी साकारणारे अभिनेता कबीर बेदी ‘द जंगीपूर ट्रायल’ या तुफानी चित्रपटातही दिसणार आहे.शूटिंग लोकेशनबद्दल बोलायचे झाले तर 'द जंगीपूर ट्रायल'चे शूटिंग अशा ठिकाणी झाले आहे जिथे आजपर्यंत एकाही हिंदी चित्रपटाचे शूटिंग झाले नाही. पश्चिम बंगालपासून 8 तासांच्या अंतरावर असलेल्या या सुंदर ठिकाणी निसर्गाने आपले हात पसरले आहेत. तेथील सुंदर हवेल्या आणि दृश्ये दिग्दर्शकाने या चित्रपटात टिपली आहेत. या चित्रपटाची कथा इतकी दमदार होती की, दररोज शहर ते गाव असा सलग 8 तासांचा प्रवास केल्यानंतरही हे सर्व स्टार्स उत्साहात होते.

(हे वाचा:Stop It डॅड' फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL )

'द जंगीपूर ट्रायल' हा मल्टिस्टारर चित्रपट आहे. प्रत्येक पात्र स्वतःमध्ये खूप महत्वाचे आहे. कथेशी प्रत्येकाची तार जोडलेली आहे. कबीर बेदी व्यतिरिक्त या चित्रपटात झाकीर हुसेन, जावेद जाफरी, व्रजेश हिरजी, कन्नन अरुणाचल, अमित बहल, इश्तेयाक खान, सुशील पांडे, रवी झंकल, जय उपाध्याय, दीपक काझीर, समिक्षा भटनागर, चिराग वोरा, राजेश खट्टर आणि सताब हे कलाकार आहेत. रॉय पश्चिम बंगालमध्ये तीन वेळा खासदार राहिलेली ही सुपरस्टार या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये हात आजमावणार आहे. एका सत्य घटनेवर आधारित, हा चित्रपट गोल्डन एरामधील सिंगल थिएटर्सची गजबज आणि त्यातून निर्माण झालेल्या हत्येचे रहस्य दाखवेल. तसेच हे प्रकरण सोडवण्याचा रोमांचक प्रवास जंगीपूर खटल्यात चांगला दाखवला जाईल.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment