Home /News /entertainment /

सनी लिओनीकडे 74 वर्षीय अभिनेत्यानं मागितला पर्सनल नंबर, आणि...

सनी लिओनीकडे 74 वर्षीय अभिनेत्यानं मागितला पर्सनल नंबर, आणि...

अभिनेत्यानं सनीकडे पर्सनल नंबर मागितल्यावर तिनं जे केलं ते पाहून तुम्हालाही तिचा आदर वाटेल.

  मुंबई, 21 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी कोणत्याही फंक्शनला जाते त्यावेळी सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या पाहायला मिळतात. अडल्ट इंडस्ट्रीतून बाहेर पडून सनीला आता बराच काळ उलटला आहे आणि आता ती बॉलिवूडचा भाग झाली आहे. नेहमीच हसतमुख चेहरा आणि साधेपणा ही सनीची ओळख आहे. नुकतच सनीनं डब्बू रत्नानीसाठी फोटोशूट केलं. ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. सनीनं रत्नानीच्या कॅलेंडर लॉन्चला हजेरी लावली होती. पण या ठिकाणी असं काही झालं ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. स्पॉटबॉय ईनं दिलेल्या वृत्तानुसार डब्बू रत्नानी कॅलेंडर लॉन्चला सनी लिओनी आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता कबीर बेदी यांची भेट झाली. यावेळी बोलता बोलता त्यांनी सनीकडे तिचा नंबर मागितला. पण सनीनं त्यांना स्वतःचा नंबर देण्याऐवजी पती डेनिअलचा नंबर दिला. आता या गोष्टीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत सनीनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे याची पुष्टी न्यूज 18 लोकमत करत नाही. अरे हो हे खरंय! शिल्पा शेट्टी दुसऱ्यांदा झाली आई
  यंदा डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी भूमि पेडनेकर, सैफ अली खान,सनी लियोनी, विद्या बालन, जॉन अब्राहम, विकी कौशल,परिणीति चोपड़ा, टाइगर श्रॉफ, वरुण धवन, अनन्या पांडे, अनुष्का शर्मा, कियारा आडवाणी आणि कृति सेनन यांनी फोटोशूट केलं. मात्र यातील कियारा अडवाणीच्या फोटोमुळे बरेच वाद निर्माण झाले. एवढंच नाही तर या फोटोशूटवरून नेटकऱ्यांनी डब्बू रत्नानीला ट्रोल सुद्ध केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी पतीसोबत इंटिमेट झाली अभिनेत्री, व्हायरल होतोय असा VIDEO नेहमीच चर्चेत राहीलेत कबीर बेदी अभिनेता कबीर बेदी त्यांच्या खासगी जीवनामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी आतापर्यंत एकूण 4 लग्नं केली आहेत. त्यांची शेवटची पत्नी परवीन दुसांझ त्यांच्याहून तब्बल 29 वर्षांनी लहान आहे. कबीर यांनी 2016 मध्ये त्यांच्या 70 व्या वाढदिवसांला परवीनशी लग्न केलं होतं. परवीन एक मॉडेल, अभिनेत्री आणि टीव्ही प्रोड्युसर आहे. लग्नाआधी अनेक वर्ष परवीन आणि कबीर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. शाहिद कपूरशी ब्रेकअप, 13 वर्षांनंतर करिनानं केला धक्कादायक खुलासा
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Sunny Leone

  पुढील बातम्या