02 मार्च : सुपरस्टार रजनिकांत सध्या त्यांच्या आगमी सिनेमात व्यस्त आहे. त्यांच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'काला' सिनेमाचा एक नवा टीझर सध्या रिलीज झाला आहे. निर्माता धनुषनं या सिनेमाची निर्मिती केली असून पा. रंजीत यांनी दिग्दर्शन केलंय.
या सिनेमाच्या निमित्तानं प्रेक्षकांना पहिल्यांदाच नाना पाटेकर आणि रजनीकांत यांच्या अभिनायची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं संपूर्ण शुटिंग मुंबई, विशेषता धारावी झोपडपट्टी मध्ये झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या काळाजाल भिडणार सिनेमा असेल का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.